राजकारण

Ahmednagar Politics : निवडणुकीत उमेदवार बाहेरचा नकोच..स्थानिकच द्या ! भाजपमध्ये खदखद

Ahmednagar Politics : आगामी लोकसभा, विधानसभेच्या अनुशंघाने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. भाजप विशेषतः जास्त कंबर कसून आहेत. दरम्यान आगामी विधानसभेला भाजपने जर स्थानिक उमेदवार नाकारले व दुसऱ्या ठिकाणच्या उमेदवारास उमेदवारी दिली तर मात्र भापचे गणित बिघडू शकते असे दिसते.

याचे कारण असे की श्रीरामपुरात विधानसभा निवडणुकीत भाजपने स्थानिक उमेदवार दिला तरच कमळ फुलेल, असे जाहीर भाष्य माजी जिल्हा सरचिटणीस सुनील वाणी यांनी केले आहे. भाजपच्या संभाव्य उमेदवाराबाबत प्रथमच पक्षातून जाहीर वक्तव्य आले आहे.

त्यामुळे काही इच्छुकांनाही याचा धक्का बसला आहे. श्रीरामपूर तालुक्यासह राहुरीतील ३२ गावांचा मतदारसंघात समावेश होतो. मतदारसंघ २०१९ पासून अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे.

दीर्घ काळासाठी या मतदारसंघावर काँग्रेसचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. दुसरीकडे भाजप व शिवसेना युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला होता. त्यामुळे भाजपला येथे ताकद आजमावता आलेली नाही.

मात्र, २०१४ मध्ये शिवसेना व भाजपची आघाडी बिघडल्याने येथे भाजपकडून भाऊसाहेब वाकचौरे यांनी उमेदवारी केली होती. त्यावेळी वाकचौरे यांनी दुसऱ्या क्रमांकाची ४५ हजार मते घेतली होती. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या विधानसभेला भाजपला जागा मिळेल, असा कार्यकर्त्यांना विश्वास आहे. त्यामुळे अनेकजण येथे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे.

भाजपचे नेते सुनील वाणी यांनी पत्रक प्रसिद्ध करत पक्षाने केवळ स्थानिक उमेदवाराला पसंती द्यावी, असे जाहीर आवाहन केले आहे. पक्षाने येथून अभ्यासू, सुशिक्षित, सुसंस्कृत, दांडगा जनसंपर्काचा व जनतेला परिचित उमेदवार द्यावा. बाहेरून उमेदवार आयात करू नये, अस वाणी यांनी म्हटले आहे.

पदाधिकाऱ्यांत नाराजगी, भाजपची वाट बिकट?

पक्षाने विधानसभा प्रमुख पदावर स्थानिक कार्यकर्त्याची नियुक्त्ती करणे अपेक्षित होते. मात्र बाहेरच्या व्यक्त्तीला तेथे बसवण्यात आले आहे. तसेच एक व्यक्ती एक पद या धोरणाला तिलांजली देण्यात आली, अनेक पदे असणाऱ्याला विधानसभेचे प्रमुखपद दिल्याची टीका सुनील वाणी यांनी केली आहे.

त्यामुळे जर पदाधिकाऱ्यांतच नाराजगी असेल तर मग भाजपची वाट बिकट होणार का? पाडापाडीचे राजकारण जर झाले तर भाजपला आगामी निवडणूक जड जातील का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts