मुंबई : आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी गर्दी केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या देखील बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवर आल्या होत्या. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांच्यावर पेडणेकरांनी चांगलीच आगपाखड केली आहे.
दीपक केसरकर उडते पक्षी आहेत. येथून उड आणि तिथे बस, तिथून उड आणि इथे बस असंच करत असतात. आमच्यासारख्या कट्टर शिवसैनिकांना त्यांच्याबद्दल विचारु नका, असे म्हणत दीपक केसरकरांवर किशोरी पेडणेकरांनी सुनावलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेवर आम्ही शिवसेनेचा भगवा फडकवणार, असा विश्वास किशोरी पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.