Devendra Fadnavis : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात होते. यावेळी ते म्हणाले की, ”शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती, पण त्यांना फडणवीस मुख्यमंत्री नको होते”, असा मोठा दावा त्यांनी केला आहे.
यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. मी आधीच सांगितलं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये हा त्यांचा एकमेव अजेंडा होता. शरद पवारांना माहिती होतं की फडणवीस मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस भुई सपाट होईल. यामुळे त्यांना भीती होती.
त्यामुळे शरद पवारांना भाजप सोबत युती हवी होती. पण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून नको होते, शरद पवार हे फडणवीस द्वेशी आहेत. त्यांना राज्यात कोणीही मुख्यमंत्री चालेल पण फडणवीस नको. त्यांचा अजेंडा आहे की, फडणवीसांना विरोध करायचा.
तसेच फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शरद पवार काहीही करू शकतात, असा आरोपही बावनकुळे यांनी केला. यामुळे आता पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कसब्यामध्ये भाजप आणि महायुतीचे उमेदवार चांगल्या मताने जिंकून येतील.
आमचे कार्यकर्ते चांगल्या प्रकारे प्रचार करत आहेत. राज्य आणि केंद्र हे डबल इंजिन सरकार मुक्ता टिळक यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करतील, असेही ते म्हणाले. सध्या राज्यातील अनेक बडे नेते हे पुण्यात ठाण मांडून आहेत.