राजकारण

Dr. Eknath Shinde : आता एकनाथ शिंदे नाही, तर डॉ. एकनाथ शिंदे म्हणायचे! मुख्यमंत्र्यांना डी. लीट पदवी प्रदान

Dr. Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल त्यांना ही मानद डी.लीट पदवी प्रदान करण्यात आली आहे. यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही तर डॉ. एकनाथ शिंदे असे म्हणावे लागणार आहे.

डी. वाय पाटील विद्यापीठाकडून एकनाथ शिंदे यांना डी. लीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी राज्यपाल देखील उपस्थित होते. डी वाय पाटील स्टेडियममध्ये पार पडलेल्या दीक्षांत समारोहात त्यांना डी.लीट ही पदवी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली.

यामुळे यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, कोरोना काळात रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी, त्याना रेमडेसीवीर आणि इतर औषधे मिळावीत, यासाठी शिंदे यांनी प्रयत्न केले होते.

तसेच वैद्यकीय सोयी सुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता आणि बेडस रुग्णवाहिका वेळेत मिळाव्यात यासाठी देखील त्यांनी विशेष प्रयत्न केले. यामुळे त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. तसेच कोल्हापूर महाड येथे आलेल्या महापूरावेळी मदतकार्य त्यांनी हाती घेण्यात आले होते.

आशा अनेक नैसर्गिक आपत्तीच्या वेळी धावून जात त्यांनी केलेल्या मदतीमुळे त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. याबाबत डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील यांनी यावेळी सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts