राजकारण

डॉ. सुजय विखेंनी घेतली भाजपा अधिवेशनाच्या तयारीसाठी बैठक

९ जानेवारी २०२५ शिर्डी : शिर्डी येथे भाजपाचे महाअधिवेशन १२ जानेवारी रोजी होणार असून, या अधिवशेनच्या तयारीसाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी तब्बल ४ तास मॅरेथॉन आढावा बैठक घेतली.

शिर्डी येथे होणारे हे अधिवेशन ऐतिहासिक करण्यासाठी विखे पाटील यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.त्यासाठी विखे पाटील यांच्याकडून तयारीसाठी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी भाजपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, विवेक कोल्हे,विनायकराव देशमुख, सत्यजित कदम, भैय्या गंधे, विश्वनाथ कोरडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच केंद्रीय मंत्री, खासदार, राज्यातील मंत्री, आमदार व २ हजार पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

या भव्य अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी १२ पेक्षा जास्त विषय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व समित्यांच्या कामाचा आणि तयारीचा आढावा डॉ. सुजय विखे पाटील यांनी घेतला.चार तासापेक्षा जास्त वेळ चाललेल्या या बैठकीत ५०० पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाली होते.

Sushant Kulkarni

Published by
Sushant Kulkarni

Recent Posts