Eknath Shinde : सध्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी गुरुवारी संपली. यामुळे अंतिम निकाल काय लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात १५ वर्षांपासून वकिली करणारे ॲड सिद्धार्थ शिंदे यांनी निकालाबाबत त्यांनी अंदाज वर्तविले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणी करायला सांगणार राज्यपालाचे पत्र रद्द होऊ शकत. पण, ठाकरेंनी राजीनामा दिल्याने तो विषय तेथेच संपतो. असे असताना मात्र राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना का आणि कशाच्या आधारावर बोलावले? त्यांना बोलावणंच चुकीचे होत, असेही म्हटले आहे.
यामुळे एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाऊ शकते. या प्रकरणात भाजपकडे संख्याबळ असल्याने सरकार वाचेल, पण शिंदेंना राजीनामा द्यावा लागू शकतो, असे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी म्हटले आहे.
तसेच ही शक्यता आणि अंदाज आहे, निकाल नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच हे प्रकरण गुंतागुतीचे असल्याने ते सात अथवा नऊ घटनापीठाकडेही जाऊ शकते. सरन्यायाधीश यांसदर्भात आपले मत व्यक्त करतात.
त्यांना या प्रकरणात कमीत कमी तीन न्यायाधीशांचा पाठिंबा मिळेल, असे मला वाटते. यामुळे आता काय निकाल लागेल हे लवकरच समजेल. येणाऱ्या काही दिवसात याबाबत निकाल जाहीर करण्यात येणार आहे.