राजकारण

Eknath Shinde : पुण्यात मुख्यमंत्र्यांनीच वाटले पैसे? आरोपाने राज्यात उडाली खळबळ..

Eknath Shinde : रविवारी पुण्यातील कसबा आणि चिंचवडमध्ये पोट निवडणुकीसाठी मतदान पार पडले. असे असताना ही निवडणूक सर्वात जास्त चुरशीची केली गेली. पहिल्यापासूनच ही निवडणूक चर्चेत राहिली. अर्ज भरण्यापासून ते प्रचार सर्वच गोष्टीची मोठी चर्चा झाली.

कसब्यात अनेक वाद देखील झाले. राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या कसबा पेठच्या पोटनिवडणुकीत मतदानानंतरही वाद संपण्याचे नाव घेत नाही. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आता महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांवर देखील गुन्हा दाखल झाला आहे.

असे असताना आता महाविकास आघाडीचे उमेदवार धंगेकरांनी खळबळजनक आरोप केले आहेत. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री व नेते कसबामध्ये पैसे वाटत फिरत होते, त्यांच्याकडून ३० कोटी रूपये वाटले गेले आहेत.

ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसबा मतदारसंघात प्रचार संपल्यानंतर पैसे वाटत फिरत होते. त्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील मतदारसंघात फिरत होते. ही गोष्ट निवडणूक आयोगाला लक्षात आली नाही का? ही लोक पैशाचे आमिष दाखवत मतदारसंघात फिरतात.

पोलिसांनी देखील काही केले नाही. पोलिसांना यांच्यावर गुन्हा दाखल का करता आलं नाही? या आरोपाने मात्र खळबळजनक उडाली आहे. आता निकालावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत.

आता 2 तारखेला निकाल आहे. यामुळे हा निकाल येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी खूप महत्त्वाचा आहे. यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार प्रयत्न केले आहेत. अनेक नेते पुण्यात तळ ठोकून होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts