राजकारण

Gautam adani : अदानी यांची फक्त 30 मिनिटं चौकशी करून दाखवा! खासदाराचे थेट मोदींना आव्हान

Gautam adani : देशासह संपूर्ण जगात सध्या उद्योजक गौतम अदानी यांची चर्चा सुरू आहे. गौतम अदानी यांच्या अनेक कंपन्यामधून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. तसेच शेअर्स देखील पडले आहेत. सध्या त्यांची अनेक प्रकरणे पुढे येत आहेत. यामुळे आता त्यांचा श्रीमंतांच्या यादीतील नंबर देखील खाली आला आहे.

असे असताना आता खासदार संजय राऊत यांच्या यांनी अदानी यांच्या चौकशीची मागणी केली आहे. भाजपने अदानींची 30 तास नव्हे 30 मिनिटं तरी चौकशी करून दाखवावी, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

राऊत म्हणाले, इतरांच्या मागे ईडी, सीबीआय सारख्या तपासयंत्रणा लावतात. पण देशात एवढा महाघोटाळा झाला असताना केंद्र सरकार गप्प का? घोटाळा झाल्याचे हिंडेनबर्ग या अमेरिकन एजन्सीने सांगितलं असताना ईडी आणि सीबीआय तिकडे का जात नाही? असेही ते म्हणाले.

हिंडेनबर्ग या अमेरिका स्थित रिसर्च एजन्सीने अदानी समूहावर अनेक आरोप केले आहेत. एजन्सीने नुकत्याच केलेल्या एका संशोधनाच्या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, हिंडेनबर्ग या रिसर्च एजन्सीने अदानी समूहावर फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. यामुळे आता अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अनेकांनी याठिकाणी पैसे देखील गुंतवले होते. यामुळे आता काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

असे असताना मात्र केंद्र सरकारने यासंबंधात काहीही चौकशी केलेली नाही. यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेस देखील आता याविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. यामुळे मोदी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts