राजकारण

Government of Maharashtra : मोठी बातमी! राज्याच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी, सुनावणीकडे राज्याचे लक्ष

Government of Maharashtra : आज राज्याच्या राजकारणातील एक महत्वाचा दिवस आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीत काय होणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. यामुळे काय होणार हे लवकरच समजेल.

या संदर्भात ठाकरे गटाने आज सुप्रीम कोर्टात जोडपत्र सादर केले आहे. पाच मुद्दे पुन्हा जोडपत्रातून मांडण्यात आले आहेत. आमदारांवर अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना आमदारांनी कार्यवाही केली. राज्यपालांनी अधिकारांचा गैरवापर करत बहुमत चाचणी बोलावली यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत अध्यक्षीय निवडणुकीत अपात्र आमदारांनी मतदान केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली, हे मुद्दे या जोडपत्रात मांडण्यात आले आहेत. दरम्यान, राज्याच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयात आज सुनवणी होणार आहे. या सुनावणीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.

सत्तासंघर्षावर याच्याआधी सुनावणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे आज ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे सुनावणीनंतर निकाल येतो का याकडे सगळ्यांचे लक्ष लागल आहे. आज शिवसेनेकडून वकील हरीश साळवे युक्तिवाद करणार आहेत.

तसेच राज्यपालांच्या वतीने सोलिसेटर जनरल तुषार मेहता हे बाजू मांडतील. त्यामुळे आज सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय होते हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे. दरम्यान शिंदे गटाला झुकते माप मिळत असल्याने ठाकरे गट याआधीच आक्रमक झाला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts