राजकारण

Ahmednagar Politics : विखे पाटील परिवारावरील आरोप किती खरे किती खोटे ? ‘त्यांनी’ स्पष्टच सांगितले…

Ahmednagar Politics : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहाता तालुक्यासह जिल्ह्याच्या विकासाची प्रक्रीया वेगाने पुढे जात आहे. मात्र काही लोकांना हे सहन होत नाही.

वास्तविक ज्यांना स्वतःचा तालुका सांभाळता आला नाही, त्यांनी निधी देत नसल्याचा केलेला आरोप अत्यंत हस्यास्पद आहे, अशी टीका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष डॉ. धनंजय धनवटे यांनी केली आहे.

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डॉ. धनवटे यांनी म्हटले आहे की, विखे पाटील परिवाराच्या माध्यमातून जिल्ह्यात आणि तालुक्यात विकासाची प्रक्रीया कशी पुढे जाते, हे वर्षानुवर्षे सर्वांनी पाहिले आहे. कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता सार्वजनिक कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची भूमिका ही विखे पाटील परिवाराची असते;

मात्र काही बाहेरच्या अपप्रवृत्ती तालुक्यात येऊन जनतेची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण त्यांचा हा केवीलवाना प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. राहाता तालुक्यातील जनता ही अतिशय सुज्ञ असून, विखे पाटील यांच्या कामाची पद्धत जनतेला चांगली माहीत असल्याने त्यांच्या विरोधात मोर्चे काढून गरळ ओकण्याचा केलेला प्रयत्न हस्यास्पद ठरला आहे.

ज्या गावातील प्रश्नांचे भांडवल करुन संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी मोर्चा काढला, त्या गावांत मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी यापुर्वी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

यामध्ये रामपूरवाडीला १ कोटी रुपये, नपावाडीला १ कोटी ६३ लाख, चितळी गावासाठी ७ कोटी ३३ लाख, जळगावला २ कोटी, धनगरवाडीला १ कोटी इतक्या निधीतून विकासकामे मार्गी लागत आहेत. तरीही निधी मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे. तो निराधार आणि व्यक्तिद्वेशातून असल्याची टीका डॉ. धनवटे यांनी केली.

विकास प्रक्रीयेत राहाता तालुका हा राज्यात वरच्या स्थानावर आहे. शासनाच्या व्यक्तिगत लाभाच्या योजनाही प्रत्येक गावापर्यंत पोहोचत आहेत. हे सहन होत नसल्याने आता केवळ विखे पाटलांना बदनाम करण्यासाठी तालुक्यात येऊन या विकास प्रक्रीयेला बदनाम केले जात आहे; पण त्यांचा हा डाव तालुक्यातील जनता कदापीही यशस्वी होऊ देणार नाही.

कारण गणेश कारखाना निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, हे सभासदांनी आता अनुभवले आहे. ‘इतर कारखान्यांपेक्षा आम्ही ५० रुपये जादा भाव देऊ,’ अशा वल्गना करणाऱ्यांनी २५० रुपये भाव कमी देऊन शेतकरी,

सभासदांची केलेली फसवणूक सगळ्यांना पाहायला मिळाली आहे. कामगारांचे पगारही करू न शकलेल्यांनी या भागात येऊन ज्ञान देण्याचे काम करू नये, असा इशारा डॉ. धनवटे यांनी पत्रकातून दिला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts