Jayant Patil : काही दिवसांपूर्वी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. असे असताना आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.
त्यानंतर आता आज ते पहिल्यांदाच सभागृहात दाखल होणार आहेत. मागील दोन दिवसांपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. पण कुटुंबात लग्न असल्यामुळे मागील दोन दिवस जयंत पाटील विधानभवनात हजर नव्हते. यामुळे आता त्यांचा आक्रमकपणा पुन्हा एकदा दिसणार आहे.
जयंत पाटील दोन दिवस का दिसले नाहीत. याच्या बातम्या देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होत्या. आता याबाबतचे कारण समोर आले आहे. यामुळे आता अजित पवारांच्या जोडीला जयंत पाटील दिसणार आहेत.
असे असताना आता आज निलंबनाच्या कारवाईनंतर ते पहिल्यांदाच विधानभवनात दाखल होतील. त्याआधी जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या विधानभवनातील विविध भाषणांचा एक टीझर तयार करण्यात आला.
तसेच तो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ सध्या चर्चेत आहे. आता विधानसभेत जयंत पाटील किती आक्रमक होणार हे लवकरच दिसेल. सध्या सरकारवर चारी बाजूने टीका केली जात आहे.