राजकारण

Ahmednagar Politics : विकासकामांच्या श्रेयावरून कलगीतुरा ! काम विखेंनी केले सांगत भाजप पदाधिकारी आक्रमक, थोरातांच्या पाठपुराव्यातूनच यश मिळाल्याचे सांगत काँग्रेस-सेनेचा पलटवार

Ahmednagar Politics : संगमनेर शहरात नुकतेच गांधी नगर झोपडपट्टीतील रहिवाशांना नगरपालिकेने भोगवटादार म्हणून कर वसुलीसाठी असेसमेंट उतारा देण्यास सुरवात झाली आहे. परंतु यावरून भाजप व काँग्रेस – सेनेच्या पदाधिकाऱ्यांत श्रेयवादाची लढाई जुंपली आहे.

हे काम आमच्यामुळेच झाले असे कॉंग्रेसचे पदाधिकारी सांगतायत तर असेसमेंट उतारा म्हणजे सातबारा नव्हे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले व माजी नगरसेवक जावेद जहागीरदार हे सांगतायेत.

अॅड. गणपुले यांनी आयोजित एका पत्रकार परिषदेत सांगितले की, यासाठी आपण अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे संघर्ष करत आहोत. मात्र, शिवसेनचे अमर कतारी हे काँग्रेस नेत्यांच्या सांगण्यावरून बोलत आहेत असा घणाघात केला.

तर दुसरीकडे कतारी यांनी भाजपने फुकटचे श्रेय लाटू नये. आम्ही यासाठी ४० वर्षांपासून संघर्ष करत आहोत. आत्ताशी आम्हाला नगरपालिकेकडून असेसमेंट उतारा मिळण्यास सुरुवात झाली. त्याचेही श्रेय भाजपचे स्थानिक पदाधिकारी लाटत असल्याचे ते म्हणाले.

आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे व माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा ठेवला. त्यांच्याच प्रयत्नामुळे पालिकेकडून असेसमेंट उतारे मिळणार आहेत. ९ जानेवारी २०२३ ला या संदर्भात शहरपालिकेला निवेदन दिले.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे तातडीने नगर रचना विभागाकडे आमच्या मागणी संदर्भात पालिकेकडून पाठपुरावा झाला. आमच्या घरांची मोजणी करण्यात आली.

त्यानंतर कुठेतरी आता ३५ वर्षानंतर घरपट्टी सुरू झाली. आताही सगळे कामे होऊ द्या मग लागेल ते श्रेय घ्या, पण तुम्ही सुरु असणाऱ्या कामात खोडा घालू नका अशी टीका केली. एकंदरीतच या कामावरून आता भाजप व काँग्रेस-सेनेच्या पदाधिकाऱ्यांत श्रेयवादावरून कलगीतुरा रंगला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts