Kasaba : पुण्यात सध्या पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या निवडणुकीसाठी अनेक घडामोडीनंतर उमेदवार ठरले आहेत. कसब्यात हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे मात्र नाराजी पसरली असल्याचे सांगितले जात आहे.
या मतदार संघात यापूर्वी गिरीश बापट, त्यानंतर मुक्ता टिळक यांनी प्रतिनिधित्व केले आहे. याठिकाणी ब्राम्हण समाज मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे हा समाज उमेदवारांना साथ देणारा असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले आहे.
आता मात्र भाजपने येथील उमेदवारही जाहीर केला. त्यानंतर ब्राम्हण समाजात नाराजी असल्याचे बोलले जात आहे. कसब्यात ब्राम्हणेत्तर उमेदवार दिल्याने हिंदू महासभेच्या वतीने ब्राम्हण समाजाच्या तीव्र भावना निर्माण झाल्याचे सांगिण्यात येत आहे.
दरम्यान, हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी कसबा पोटनिवडणुकीतील भाजपने दिलेल्या उमेदवारीवरून ब्राम्हण समाजात तीव्र नाराजी पसरल्याचे सांगितले. यामुळे याचा फटका या निवडणुकीत पक्षाला बसण्याची शक्यता आहे.
भाजपकडून चिंचवडमध्ये न्याय तर कसब्यात अन्याय केल्याचा आरोपही यावेळी केला गेला आहे. यामुळे आता निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा उमेदवार बदलण्याची देखील मागणी होत आहे.