Kasba by-election : सध्या पुण्यात कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यामुळे कोण विजयी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसब्यात, तर लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने चिंचवडमध्ये पोटनिवडणुक होत आहे. असे असताना आता मतमोजणी पुढे येत आहे.
यामध्ये कसब्यात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत. तसेच चिंचवडमध्ये भाजप उमेदवार आश्विनी जगताप पुढे आहेत. चिंचवडमध्ये काटे की टक्कर बघायला मिळत आहे. धंगेकरांनी तीन हजारी आघाडी घेतली आहे. रासनेंनी २ हजार ८०० मते हे पहिल्या फेरीत मिळाली आहे.
अश्विनी जगताप यांनी दीड हजार मतांची आघाडी घेतली आहे. चिंचवडमध्ये पोस्टल मतदानात ४०५३ मते मिळाली आहे. तर राहुल कलाटे १२७३, नाना काटे यांना ३ हजार ६०५ मते मिळाली आहेत. यामध्ये अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत.
दरम्यान, कसबा पेठ आणि चिंचवड या दोन मतदारसंघात सुरु असलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी आहे. मतमोजणी प्रारंभ झाला आहे. यामुळे कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे.
यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिन्ही उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. चिंचवडमध्ये अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तर भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे.