राजकारण

Kasba by-election : कसब्यातील ५० मनसैनिकांचे तडकाफडकी राजीनामे, काँग्रेसचा प्रचार केल्याने प्रकरण तापले..

Kasba by-election : सध्या पुण्यात कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले आहेत. यामुळे वातावरण तापले आहे. असे असताना राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. यामुळे निवडणुकीत उभा नसताना देखील त्यांची चर्चा सुरू आहे.

पुण्यातील मनसेच्या ५० कार्यकर्त्यांनी राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला आहे. कसबा पोटनिवडणुकीत मनसेने भाजपच्या हेमंत रासने यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, अलीकडेच मनसेचे काही कार्यकर्ते काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा प्रचार करताना दिसून आले होते. यामुळे पक्षाने कारवाई केली होती.

या कारवाईनंतर काहीवेळातच कसबा विधानसभा मतदारसंघातील मनसेच्या ५० कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे पुण्यात मनसेला खिंडार पडले आहे. यामुळे निवडणुकीत उभे नसताना देखील पक्षात अनेक घडामोडी घडत आहेत.

या सर्व कार्यकर्त्यांनी आपला राजीनामा शहराध्यक्षांकडे पाठवला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. मनसेचे हे ५० कार्यकर्ते उघडपणे काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करणार आहेत. याचा फटका भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनाही बसू शकतो.

कसबा विधानसभा मतदारसंघ गेली अनेक वर्षे भाजपचा बालेकिल्ला आहे. यामुळे भाजपने जोरदार प्रचार केला आहे. असे असले तरी याठिकाणी आता समीकरण बदलले आहे. यामुळे भाजपसाठी ही निवडणूक जड जात आहे.

मनसेलाच खिंडार पडल्याने भाजपच्या हेमंत रासने यांची अडचण होऊ शकते. यामुळे या निवडणुकीत आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या सर्वच पक्षांचे बडे नेते याठिकाणी तळ ठोकून आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts