राजकारण

Kasba By-Election : बापट पुन्हा मैदानात, नाकात नळ्या, ऑक्सिजन सिलेंडर, आजारी असतानाही बापटांनी केलं मतदान

Kasba By-Election : रविवारी पुण्यातील कसबा आणि चिंचवडसाठी पोट निवडणुकीसाठी मतदान पार पडले. यामध्ये चर्चा झाली ती खासदार गिरीश बापट यांची आजारी असतानाही त्यांनी कसब्याचे भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी पत्रकार परिषद घेतली होती. भाजपच्या प्रचारादरम्यान बापट यांनी आजारी असून स्वतः मैदानात उतरून पदाधिकारी यांच्यासाठी मेळावा घेतला होता.

यानंतर ते आपला मतदानाचा हक्कं बजावण्यासाठी ते मतदान केंद्रावर दाखल झाले आणि आपला मतदानाचा हक्क बजावला. याचे फोटो देखील सध्या व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, शेवटचे काही मिनिटे बाकी असताना, गिरीश बापट मतदानासाठी केंद्रावर आले. गिरीश बापट यांनी मतदान केले. आजारी असताना सुद्धा गिरीश बापट यांनी मतदानाला हजेरी लावत आपले कर्तव्य बजावले. यासाठी आज पाच वाजण्याच्या सुमारास अहिल्यादेवी शाळेच्या मतदान केंद्रावर ते पोहोचले होते.

गिरीश बापट हे मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नाकात नळ्या, ऑक्सिजन सिलेंडर, व्हिल चेअरवर असतानाही त्यांनी आजारपण अडथळा ठरू न देता, त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान, गिरीष बापट हे प्रचारात उतरले असताना विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली. लोकप्रतिनिधी आजारी असताना त्यांची काळजी घेतली जात नसताना केवळ उपयोग केला जात असल्याचे म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts