Kasba by-election : सध्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जात आहे. यात धंगेकर बाजी मारणार की रासने भाजपचा कसब्याचा गड राखणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे.
याचा निकाल 2 तारखेला लागणार आहे. असे असताना मतमोजणीपूर्वीच एक एक्झिट पोल व्हायरल झाला असून यामध्ये रवींद्र धंगेकर सरळ बाजी मारताना दिसत आहेत. यामुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे. स्ट्रेलीमा या संस्थेचा एक्झिट पोल व्हायरल झाला आहे.
त्यांचा निकाल हा भाजपच्या विरोधात जाताना दिसत आहे. याठिकाणी रवींद्र धंगेकर या ठिकाणी मोठा विजय साकारताना दिसत आहेत. यामध्ये भाजपच्या हेमंत रासने यांना ५९ हजार ३५१ तर रवींद्र धंगेकर यांना ७४ हजार ४२७ इतकी मतं मिळताना दिसत आहेत.
त्यामुळे कसब्यातील अटीतटीच्या लढतीत रवींद्र धंगेकर हे १५ हजार ७७ इतक्या मताधिक्यांनी विजय होतील, असा अंदाज या एक्झिट पोलमधून वर्तविण्यात आला आहे. यामुळे भाजपच्या गटात सध्या धाकधूक वाढली आहे.
याठिकाणी आमदारकी महत्वाची नसून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीचे बरेच गणित यावर अवलंबून आहे. यामुळे याठिकाणी सर्वच पक्षांनी ताकद लावली आहे.
दरम्यान, कसबा हा कोणत्याही पक्षाचा गड नाही, तर तो जनतेचा गड आहे. कितीही यंत्रणेचा गैरवापर केला तरीही निवडणूक जनतेने हातात घेतली होती. या एक्झिट पोलपेक्षाही जास्त मताधिक्य मला मिळेल’, असे काँग्रेस उमेदवार धंगेकर यांनी व्यक्त केला.
या एक्झिट पोल नंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. आता हा आनंद 2 तारखेपर्यंत टिकणार की भाजप विजयी गुलाल खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.