Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेची रणधुमाळी प्रचंड वाढली आहे. विखे विरोधात लंके असा सामना दिवसेंदिवस रंगू लागला आहे. कोण जिंकेल? कोण किती लीड घेईल? हे सगळे आता अंदाज वर्तवण्यात येत आहेत.
असे तर्कवितर्काचे सामने सुरु असतानाच आता एक महत्वाचे वृत्त समोर आले आहे. धनश्री विखे यांनी आता सुजय विखे यांच्या विजयाबाबत व मिळणाऱ्या लीडबाबत मोठं वक्तव्य केले आहे.
काय म्हणाल्या धनश्री विखे
धनश्री विखे म्हणाल्या, आम्ही जिंकणार तर आहोतच. आमचे प्रयत्न लीड साठी सुरु आहेत. मागील वेळी तीन लाखांचे लीड होते. यावेळी पाच लाखांचे लीड असेल असे लोक आम्हाला सांगतात असे धनश्री विखे म्हणाल्या. खा. सुजय विखे यांनी मागील पाच वर्षात मोठी कामे केली आहेत.
ज्या जनतेच्या इच्छा होत्या, कामे होती ती सर्व त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर अहमदनगर शहरात असणारा उड्डाण पूल. हा प्रश्न अनेक वर्ष रेंगाळला होता. परंतु खा. विखे यांनी सत्तेत येताच तीन वर्षात येथे उड्डाण पूल उभा केला.
तसेच नगर शहराला जोडणारी महामार्ग असतील ते देखील गडकरी साहेबांच्या मदतीने त्यांनी दुरुस्ती केली. त्यामुळे अहमदनगर मधील बहुतांशी कामे विखे यांनी मार्गी लावली असल्याने तेथे लोक त्यांच्याच मागे राहतील. पाच लाखांचे लीड देतील असा विश्वास धनश्री विखे यांनी व्यक्त केला.
पाच लाखांचे लीड
मागील वेळी खा. सुजय विखे व आ. संग्राम जगताप यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी त्यांना जवळपास तीन लाखांचे लीड होते. यंदा आता लढत चांगली घासून होईल असा अंदाज अनेक लोक व्यक्त करत आहेत.
असे असताना आता धनश्री विखे यांनी यावेळी पाच लाखांचे लीड मिळेल असा अंदाज व्यक्त केलाय. तसेच खा. विखे यांचा प्रचाराचा झंजावातही जोरात सुरु आहे. जनसम्पर्क, व केलेली कामे यावर सध्या त्यांचा जोर दिसून येतो.