राजकारण

कोपरगाव : शेतकऱ्यांचे सोयाबीन हमीभावाने खरेदी करावे, आ. आशुतोष काळे शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेत !

Kopargaon News : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील मराठवाडा, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते.

अहिल्यानगर जिल्ह्याबाबत बोलायचं झालं तर जिल्ह्यातही सोयाबीन लागवड विशेष उल्लेखनीय असून जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातही सोयाबीनचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

यंदाही तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे मुबलक उत्पन्न मिळाले आहे. मात्र बाजारात सोयाबीनला अपेक्षित भाव मिळत नाहीये. काही ठिकाणी सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरले आहेत. खरे तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी केंद्रातील सरकारकडून सोयाबीनसाठी हमीभाव जाहीर करण्यात आला आहे.

मात्र, सध्या काही भागांमध्ये शेतकऱ्यांचे सोयाबीन हमीभावात सुद्धा विकले जात नसल्याची वास्तविकता आहे. हेच कारण आहे की आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला दर मिळावा, शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळावे या अनुषंगाने जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी आमदार आशुतोष काळे मैदानात उतरले आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी तातडीने हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरु करावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याकडे केली आहे.

खरे तर सोयाबीनचे पीक हे नगदी पीक आहे. याला चांगला भाव मिळाला तर नक्कीच हे पीक शेतकऱ्यांना परवडते. याचंमुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक शेतकरी बांधव या पिकाची लागवड करतात. शेतकऱ्यांना जेव्हा अडचण असते त्यावेळी ते आपला सोयाबीन विक्री करून आपली आर्थिक अडचण दूर करू शकतात.

सोयाबीन पिकावर मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र सध्या सोयाबीनला फारसा दर मिळत नाहीये. हीच गोष्ट विचारात घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सोयाबीन हमीभावाने खरेदी करावी अशा सूचना दिलेल्या आहेत. खरेतर केंद्रातील सरकारने 2024-25 मध्ये सोयाबीनच्या हमीभावात वाढ केली आहे.

यंदा सोयाबीनचा हमीभाव 4 हजार 892 एवढा जाहीर करण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, तालुक्यातील शेतकऱ्यांनी सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदीसाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अधिकृत नोंदणी देखील केलेली आहे.

परंतु अद्यापपर्यंत हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरु करण्यात आलेली नाही. याच अनुषंगाने आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याकडे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची तातडीने हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरु करण्याची मागणी केली आहे.

तसेच हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर खरेदीसाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र हे पोर्टल बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना फारच अडचणी येत आहेत.

ही अडचण दूर करण्यासाठी अधिकृत पोर्टल नियमितपणे सुरु राहील याची काळजी घ्यावी असेही आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी म्हटले आहे. नक्कीच सोयाबीनची हमीभावाने खरेदी लवकरात लवकर सुरू झाली तर याचा फायदा तालुक्यातील शेतकऱ्यांना होईल अशी शक्यता आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts