राजकारण

मधुकर पिचड यांनी आपल्याच सूनबाईचे पैसे हडपलेत ! सुनबाईंना तब्बल 5 कोटींचा चुना लावला ? न्यायालयाने सांगितलं की….

Madhukar Pichad News : महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड अडचणीत सापडले आहेत. पिचड यांच्यावर त्यांच्याच सुनेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकी सोबतच पिचड आणि त्यांच्या कुटुंबावर कौटुंबिक हिंसाचाराचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड ऐन निवडणुकीच्या आधीच अडचणीत आले आहेत.

माजी मंत्री मधुकर पिचड यांनी त्यांची दुसरी पत्नी आदिवासी नसतानाही त्यांचा बनावट आदिवासी जातीचा दाखला बनवून घेतला अन या आधारावरच त्यांनी स्वतःच्या सुनेची संपत्ती हडप करून सुनेला फसवले असा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी जमीन अधिग्रहण कायद्यानुसार जे पाच कोटी रुपये सुनेला मिळायला हवे होते ते पैसे दुसऱ्या पत्नीला मिळण्यासाठी कागदपत्रे तयार केली असल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.

पिचड यांच्या सुनेचे वकील असीम सरोदे यांनी ही माहिती दिली आहे. मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत वकील सरोदे बोलत होते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, माजी मंत्री पिचड यांनी दुसरी पत्नी कमल पिचड या आदिवासी नसून मराठा समाजाच्या आहेत.

पण, बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांचा आदिवासी जातीचा दाखला तयार करून घेतला असून सून सरोज जितेंद्र पिचड यांच्या अनेक कागदपत्रांवर जबरदस्ती सह्या घेत स्वतःच्या ओळखींचा फायदा घेऊन सरकारी रेकॉर्डमध्ये फेरफार करून घेतला असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री यांच्यावर लावला गेला आहे.

तसेच याचं बनावट कागदपत्रांच्या आधारे माजी मंत्री यांनी आपल्या दुसऱ्या पत्नीच्या नावे जमिनी फेरफार करून घेतल्या आहेत. खरंतर याबाबत 2018 पासून अनुसूचित जाती जमाती तपासणी समितीकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

मात्र सरकारी अधिकारी पक्षपातीपणा करत आहेत. पिचड यांच्या दबाव तंत्रामुळे ही तपासणी प्रभावित होत असल्याचा दावा त्यांच्या सुनेच्या वकिलाने केला आहे. या प्रकरणात सून सरोज पिचड यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या प्रकरणाची दखल घेतली गेली नाही.

पोलिसांनी या प्रकरणात लक्ष दिले नसल्याने अखेरकार कल्याण जिल्हा व सत्र न्यायालय येथे याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी घेताना माननीय न्यायालयाने माजी मंत्री मधुकर पिचड कमल पिचड आणि इतरांवर कारवाई का केली जाऊ नये असे म्हणत संबंधितांना नोटीस बजावली आहे.

या प्रकरणात आता पुढील सुनावणी 25 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे सून सरोज पिचड यांनी त्यांच्या सासरच्या मंडळीच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा देखील गुन्हा दाखल केलेला आहे. सध्या हे प्रकरण प्रलंबित आहे.

दरम्यान या साऱ्या घटनाक्रमावर पिचड कुटुंबियांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. एकंदरीत लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभेचा रणसंग्राम रंगणार आहे. अशा परिस्थितीतच माजी आमदार अन मंत्री मधुकर पिचड आणि कुटुंब यांच्यावर गंभीर आरोप लावले गेले असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

यामुळे या प्रकरणात आता मधुकर पिचड तसेच त्यांच्या कुटुंबांकडून काय स्पष्टीकरण दिले जाते हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणीत माननीय न्यायालय काय निर्णय देते याकडेही साऱ्यांचेच लक्ष लागून आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts