राजकारण

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले ‘हे’ उमेदवार आमदार बनतील ! अहिल्यानगर जिल्ह्यामधून कोण होणार आमदार ? एक्झिट पोल काय सांगतोय

Maharashtra Assembly Election : लोकसभा निवडणुकीनंतर साऱ्या महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकांकडे लक्ष लागून होते. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी काल अर्थातच 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने आता साऱ्यांचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे, म्हणून या निकालात कोण बाजी मारणार? महाराष्ट्रातील जनता जनार्दन कोणाच्या बाजूने कौल देणार? ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

पण तत्पूर्वी याबाबत वेगवेगळे एक्झिट पोल वेगवेगळा दावा करताना दिसत आहेत. दरम्यान, प्रजातंत्र या संस्थेने सुद्धा एक्झिट पोल जारी केला असून यामध्ये कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार होणार याचीच यादी त्यांनी दिली आहे. अशा परिस्थितीत आज आपण प्रजातंत्र चा एक्झिट पोल नेमका कसा आहे, यामध्ये कोणाला बहुमत दाखवण्यात आले आहे, कोणत्या जागेवरून कोण आमदार होणार? यासंदर्भात सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

प्रजातंत्रचा एक्झिट पोल नेमका काय सांगतो?

प्रजातंत्र चा एक्झिट पोल राज्यात पुन्हा एकदा लोकसभेची पुनरावृत्ती पाहायला मिळू शकते असा दावा करताना दिसत आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले होते आणि हा प्रजातंत्र चा एक्झिट पोल विधानसभा निवडणुकीत देखील महा विकास आघाडीला चांगले यश मिळणार असा दावा करतोय. या एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 149 जागा मिळण्याची शक्यता आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 288 विधानसभा मतदारसंघ असणारे आपल्या या महाराष्ट्रात सत्ता स्थापित करण्यासाठी 145 आमदारांचे संख्याबळ आवश्यक असते. म्हणजेच ज्या आघाडीला 145 जागा मिळतील ती आघाडी राज्यात सत्ता स्थापित करणार आहे.

यानुसार राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळताना दिसत आहे. दुसरीकडे महायुतीला 127 जागा मिळतील असे या एक्झिट पोल मध्ये म्हटले गेले आहे. महाविकास आघाडीला मराठवाड्यात 30 जागा, मुंबईत 18 जागा, उत्तर महाराष्ट्र 23 जागा, ठाणे-कोकण 17 जागा, विदर्भ 31 जागा आणि पश्चिम महाराष्ट्र विभागात 30 जागा मिळतील असे यामध्ये म्हटले गेले आहे. महायुती बाबत बोलायचं झालं तर महायुतीला मराठवाड्यात 15 जागा, मुंबईत 18 जागा मिळतील, उत्तर महाराष्ट्र 21 जागा मिळतील, ठाणे-कोकण 18 जागा मिळतील, विदर्भ 29 जागा मिळतील, पश्चिम महाराष्ट्र 26 जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

या 15 हाय प्रोफाईल मतदारसंघात कोण विजयी होणार?

प्रजातंत्रच्या एक्झिट पोल मध्ये 15 हाय प्रोफाईल जागांवर कोण विजयी होणार याबाबतही अंदाज देण्यात आला आहे.

शिर्डी विधानसभा मतदार संघ : शिर्डी हा राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला. दरम्यान आपल्या याच बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा विखे पाटील आमदार होतील असा अंदाज या एक्झिट पोल मधून समोर आला आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पारडे जड दिसत आहे.

बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघाची फाईट खूपच लक्षवेधी आहे. कारण की येथे शरद पवारांचे पुतणे अजित पवार आपल्या पुतण्या विरोधात म्हणजेच युगेंद्र पवारांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. म्हणजेच येथे काका पुतण्याची फाईट आहे. यामुळे येथे काका विजयी ठरणार की पुतण्या बाजी पालटणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. तथापि या सर्वेमध्ये अजित पवार हे पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम ठेवतील आणि येथून विजय संपादित करतील असे म्हटले गेले आहे.

साकोली विधानसभा मतदारसंघ : येथून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विजयी होतील असा अंदाज या एक्झिट पोल मधून समोर आला आहे.

कोपरी-पाचपाखाडी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ बालेकिल्ला आहे. दरम्यान यावेळी शिंदे हे आपल्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा सत्ता काबीज करताना दिसणार आहेत. या मतदारसंघातुन एकनाथ शिंदे पुन्हा निवडून येतील असा अंदाज या एक्झिट पोल मध्ये वर्तवण्यात आला आहे.

नागपूर दक्षिण-पश्चिम- राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपला मतदारसंघ मजबूतपणे बांधला आहे. त्यामुळे नागपूर द. प. मतदारसंघातून पुन्हा फडणवीस विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

वरळी- मुंबईतील सगळ्यात महत्त्वाचा असा समजला जाणारा वरळी हा मतदारसंघ राखण्यात आदित्य ठाकरेंना यश येईल असं सर्व्हेत म्हटलं आहे.

वांद्रे पूर्व- ‘मातोश्री’च्या अंगणात शिवसेना ठाकरे गट विजय होणार असे दिसत आहे. या जागेवर ठाकरे गटाकडून वरून सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात असून तेच येथून विजयी होणार असे दिसते. असं झाल्यास झिशान सिद्दीकी यांना हा मोठा धक्का बसू शकतो.

दादर-माहिम- माहीम हा विधानसभा मतदारसंघ अमित ठाकरे यांच्यामुळे चर्चेत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे महेश सावंत अन महायुतीकडून सरवणकर उभे आहेत. मात्र अमित ठाकरे यांना या निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे कारण की या एक्झिट पोल मध्ये ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी होणार असा दावा करण्यात आला आहे.

इंदापूर विधानसभा मतदारसंघ : विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांचा पराभव होईल आणि येथून हर्षवर्धन पाटील विजयी होतील असे म्हटले जात आहे.

परळी वैजनाथ : राज्याचे कृषिमंत्री अजित पवार गटाचे धनंजय मुंडे हे येथून आमदार आहेत आणि ते पुन्हा एकदा आमदार होतील असे या सर्वे मध्ये म्हटले गेले आहे.

मानखुर्द-शिवाजीनगर : येथून अबू आझमी हे विजयी होणार असे म्हटले जात आहे. आझमी यांना नवाब मलिक आव्हान देत आहेत मात्र ते आपला गड राखण्यात यशस्वी होणार असा अंदाज आहे.

येवला : या मतदारसंघात पुन्हा छगन भुजबळ यांचा झेंडा फडकणार आहे. अजित पवार गटाचे छगन भुजबळ हे पुन्हा एकदा येवल्यातून निवडून येतील असा अंदाज आहे.

संभाजीनगर प. – शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाठ यांना आपल्या मतदारसंघात फटका बसण्याची शक्यता आहे. शिरसाट यांना येथून पराभव स्वीकारावा लागेल आणि येथून राजू शिंदे विजयी होतील असा अंदाज आहे.

कुडाळ- कुडाळ मतदारसंघातून वैभव नाईक हे पुन्हा निवडून येतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भूम-परांडा- मंत्री तानाजी सावंत यांना येथून पराभवाचा सामना करावा लागू शकतो असा अंदाज आहे. या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे विजयी होतील असे म्हटले जात आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts