Maharashtra BJP Candidate : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात दररोज काही ना काही नवीन घडामोड पाहायला मिळत आहे. नुकत्याच दोन ते तीन दिवसांपूर्वी भाजपाने आगामी लोकसभेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाहीये.
यावरून महाराष्ट्रात महायुतीमध्ये अजूनही जागावाटपावर शिक्कामोर्तब झालेले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. तथापि महायुती मधील जागा वाटपाचा तिढा मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सोडवला असल्याच्या चर्चा आहेत.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भाजप महाराष्ट्रात 32 जागा लढवण्यास इच्छुक आहे. तसेच महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या गटाला दहा तसेच अजित पवार यांच्या गटाला तीन जागा मिळू शकतात असे बोलले जात आहे.
तसेच उर्वरित तीन जागांवर भाजपाच्या पक्षचिन्हावर अजितदादा यांच्या गटातील तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटातील उमेदवारांना तिकीट दिले जाऊ शकते अशा चर्चा सुरू आहेत.
अशा परिस्थितीत आता आपण भाजपकडून महाराष्ट्रातील कोणत्या 32 जागांवर कोणते उमेदवार उभे केले जाऊ शकतात याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बीजेपीच्या महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांची यादी आता आपण पाहणार आहोत.
भाजपाच्या संभाव्य उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे
पुणे : मुरलीधर मोहोळ
धुळे : प्रदिप दिघावरकर
नांदेड – नुकतेच भाजपवासी झालेले अशोक चव्हाण यांची भाची मिनल खतगावकर
जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे
चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नंदूरबार : हिना गावित किंवा विजयकुमार गावीत.
अकोला : संजय धोत्रे
ईशान्य मुंबई : मनोज कोटक
सोलापूर : अमर साबळे
कोल्हापूर : सध्या ही जागा शिंदे गटाकडे आहे मात्र भाजपा आग्रही आहे.
भंडारा-गोंदिया : सुनिल मेंढे
बीड : पंकजा मुंडे
माढा – रणजितसिंह निंबाळकर
गडचिरोली : राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम भाजपाच्या चिन्हावर लढू शकतात.
भिवंडी : कपिल पाटील
अहमदनगर : सुजय विखे पाटील किंवा राधाकृष्ण विखे पाटील
सांगली : कॉग्रेसचे विशाल पाटील भाजपा पक्ष प्रवेश करून निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे.
सातारा : उदयनराजे भोसले
जळगाव : उन्मेष पाटील किंवा ए टे नाना पाटील.
दिंडोरी : भारती पवार
रावेर : अमोल जावळे
उस्मानाबाद : बसवराज पाटील
उत्तर मुंबई : केंद्रीय मंत्री पियुष गोयल
संभाजीनगर : मंत्री अतुल सावे किंवा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड
उत्तर मध्य मुंबई : आशिष शेलार
ठाणे : डॉ.संजीव नाईक
रत्नागिरी-सिंधुदुर्ग : नारायण राणे
दक्षिण मुंबई : राहूल नार्वेकर
राजेंद्र गावीत : राजेंद्र गावित (सध्या शिंदे गटात आहेत मात्र ते भाजपा पक्ष प्रवेश करून भाजपा तिकिटावर लढतील अशी शक्यता)
अमरावती : नवनीत राणा भाजपामध्ये येऊन या जागेवरून निवडणूक लढवू शकतात. या जागेवर आनंदराव अडसूळ हे देखील आग्रही.