Mahavikas Aaghadi : नुकत्याच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले घवघवीत यश मिळाले असून आता आघाडीचे घटक पक्ष विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. पण, विधानसभा निवडणुक महाविकास आघाडी साठी सोपी राहणार नाही. जागा वाटपावरून महाविकास आघाडी मधील तिन्ही घटक पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. खरे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची विचारसरणी जवळपास एकच आहे.
हे दोन्ही पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून जोडीनेच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. मात्र गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीने राज्याचे राजकारण पूर्णपणे बदलले आहे. राज्याच्या राजकारणात दोन मोठे पक्ष फुटलेत आणि यामुळे एक नवीन आघाडी उदयास आली. या महाविकास आघाडीत कधीकाळी एकमेकांना पाण्यात पाहणारे सारेच नेते सोबतीला आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना जोडीने निवडणूक लढवण्याची सवय आहे मात्र या दोन्ही पक्षांच्या विचारसरणीच्या उलट विचारसरणी असणारा शिवसेना पक्ष (ठाकरे गट) आता महाविकास आघाडीचा भाग आहे. महाविकास आघाडी स्थापित झाल्यानंतर लोकसभा निवडणूक लढवली गेली.
लोकसभेच्या निवडणुकीत कसेबसे महाविकास आघाडीने जागा वाटपाचा कार्यक्रम मॅनेज केला. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जबरदस्त यश मिळाले असल्याने आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या समोर जागा वाटपाचे मोठे आव्हान राहणार आहे.
खरे तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना दोघेही विरोधात होते. गेल्यावेळी, काँग्रेसच्या १७ आमदारांच्या विरोधात शिवसेनेने दुसऱ्या क्रमाकांची मते घेतली होती. तर, शिवसेनेच्या १५ आमदारांच्या विरोधात काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. आता काँग्रेस व शिवसेना ( ठाकरे गट ) यांच्या वादात अडकलेल्या याचं ३२ जागांबाबत काय तोडगा निघणार? ही गोष्ट विशेष पाहण्यासारखी ठरणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे याच थोडक्यावर महाविकास आघाडीचे जागावाटपाचे गणित सुद्धा अवलंबून राहणार आहे. म्हणून यावर तोडगा काढणे महाविकास आघाडीचे भवितव्य ठरवणारे ठरणार आहे. जर या 32 जागांवर काही तोडगा निघाला नाही तर नक्कीच महाविकास आघाडीत मोठी फूट पडण्याची शक्यता देखील नाकारून चालणार नाहीये. दरम्यान, आता आपण याच 32 जागा संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कोणत्या आहेत त्या 32 जागा ?
हातकणंगले विधानसभा मतदारसंघ
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ
करवीर विधानसभा मतदारसंघ
राजापूर विधानसभा मतदारसंघ
धाराशिव विधानसभा मतदारसंघ
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ
उमरगा विधानसभा मतदारसंघ
संगमनेर विधानसभा मतदारसंघ
भोर विधानसभा मतदारसंघ
महाड विधानसभा मतदारसंघ
पुरंदर विधानसभा मतदारसंघ
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ
धारावी विधानसभा मतदारसंघ
कांदिवली विधानसभा मतदारसंघ
चेंबूर विधानसभा मतदारसंघ
कलिना विधानसभा मतदारसंघ
जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघ
कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघ
ओवळा, माजीवाडा विधानसभा मतदारसंघ
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ
पालघर विधानसभा मतदारसंघ
इगतपुरी विधानसभा मतदारसंघ
मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ
जालना विधानसभा मतदारसंघ
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ
देगलूर विधानसभा मतदारसंघ
वरोरा विधानसभा मतदारसंघ
ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ
तिवसा विधानसभा मतदारसंघ
मेहकर विधानसभा मतदारसंघ
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ