राजकारण

Mahavikas Aghadi : ब्रेकिंग! 2019 सारखी जादू 2024 ला दिसणार? लोकसभा, विधानसभा एकत्र लढण्याची महाविकास आघाडीची घोषणा..

Mahavikas Aghadi : 2019 मध्ये राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केले होते. याचा चांगला फायदा झाला. असे असताना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुक महाविकास आघाडी एकत्र लढण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

भाजपला राज्यात त्यांची जागा दाखवायची असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. याबाबत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक देखील झाली आहे. यावेळी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आगामी काळात भाजपसाठी मोठी कसरत असणार आहे.

येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. याबाबत झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उद्धव ठाकरे, जयंत पाटील उपस्थित होते, अशी माहितीही राऊतांनी दिली.

यामुळे आता जागावाटप आणि इतर गोष्टी देखील ठरवल्या जाणार आहेत. तसेच यामध्ये सर्व काही ठीक झाले तर राज्यात कसबा पॅटर्न लागू होणार आहे. यावेळी राऊत म्हणाले, सध्या राज्यातील आणि केंद्रातील सरकार जात आणि धर्माच्या आधारावर राजकारण चालू आहे.

आता प्रत्येक ठिकाणी जात दाखवण्याचे काम राज्य करत असल्याचे संजय राऊत म्हणाले. सध्या ठाकरे गटाकडून नाव आणि चिन्ह गेल्यानंतर या निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी आता उद्धव ठाकरे राज्यभर सभा घेत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts