Mahavikas Aghadi : कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा गड उध्वस्त केला. यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास मोठा वाढला आहे. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असे सांगितले आहे.
यामुळे आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारला लक्ष्य करण्याची रणनिती महाविकास आघाडीकडून सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त बैठक होणार आहे. यामुळे आगामी निवडणुकीची जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, राज्यभरातील महाविकास आघाडीची विराट सभा कधी आणि कुठे होणार याची वेळ आणि तारीखही निश्चित करण्यात आली आहे. महाविकास आघाडीची नागपुरातून १६ एप्रिल रोजी पहिली सभा होणार आहे. तर या १६ एप्रिलपासूनच महाविकास आघाडीच्या सभा सुरू होणार आहेत.
यामध्ये १ मे रोजी मुंबई, १४ मे पुणे, २८ मे रोजी कोल्हापूर आणि ३ जून रोजी नाशिकमध्ये मविआची सभा होणार आहे. या सर्व मविआच्या सभेला उद्धव ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे. यामुळे जोरदार तयारी असणार आहे.
काही दिवसांपूर्वी कोकणात देखील उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. यावेळी मोठी गर्दी झाली होती. यामुळे आगामी काळात देखील आपल्याला यश मिळेल, असा विश्वास महाविकास आघाडीला आहे. यामुळे आता का दौरा कसा होणार हे लवकरच समजेल.