राजकारण

Ahmednagar Politics : लोकसभेच्या रिंगणात MIM ! लोकसभेसाठी नगरची चाचपणी, डोकेदुखी वाढणार पण कुणाची? पहा..

काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आता सगळेच सुसज्ज झाले आहेत. सर्वच पक्ष चाचपणी करत आहेत. आता यामध्ये ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच MIM (AIMIM) देखील मागे नाही. MIM (AIMIM) ने महाराष्ट्रात तयारी सुरू केली असून नगर जिल्ह्यात चाचपणी सुरू केली असल्याची माहिती मिळाली आहे. MIM च्या एन्ट्रीने आता अनेकांच्या डोकेदुखी वाढणार आहे हे मात्र निश्चित.

बऱ्याच घडामोडींच्या छायेत लोकसभा

महाराष्ट्रात सध्या अनेक घडामोडी घडून गेल्या आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांत गेल्या वर्षी हिंदूत्वाचे प्रयोग झाल्याचे समोर आले. गेल्या वर्षी काही जिल्ह्यांत जातीय दंगलीसह तणावही निर्माण झालेलं पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, अमरावती, जळगाव, नाशिक, बीड आदी ठिकाणी असे तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.

तसेच राजकीय घडामोडी पाहिल्या तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट ही देखील एक मोठी बाजू यावेळी निवडणुकांत असणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर MIM ने (AIMIM) राज्य संघटनेकडून चाचपणी सुरू झाली आहे. त्यामुळे आता अनेकांचे गृहीत धरलेली मते किंवा इतर गणिते अनेकांचे चुकणार आहेत.

‘एमआयएम’च्या अजेंड्याखाली ‘ते’ मतदार येतील ?

राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आणि देशात ‘इंडिया’ आघाडी विरुद्ध भाजपप्रणीत एनडीए असा लढा होईल. यात महाराष्ट्रात MIM नेही उतरण्याचा निर्णय घेतला असून लोकसभेसाठी स्वतंत्र चाचपणी सुरु असल्याचे समजते. या पक्षाची महाराष्ट्रात ताकद कमी आहे असे मानले जाते. पण असे असले तरी गेल्या वर्षीच्या दंगलीत ज्या अल्पसंख्याक, मागासवर्गीय, दलित घटक, बहुजनांना झळ बसली, तो समाज ‘एमआयएम’च्या अजेंड्याखाली येऊ शकतो असे राजकीय अंदाजकार अंदाज वर्तवत आहेत.

एमआयएमचे किती हे बलाबल ?

विधानसभा 2019 मध्ये ‘एमआयएम’ला 7 लाख 37 हजार 888 (1.34 टक्के) मते मिळाली असून महापालिकेचा विचार केलं तर छत्रपती संभाजीनगर 25, अमरावती दहा, सोलापूर नऊ, मालेगाव सात, धुळे चार, मुंबई दोन, ठाणे दोन, कल्याण दोन आणि पुणे एक अशा जागा एमआयएमने जिंकल्या आहेत. ग्रामपंचायतींमध्ये 102 सदस्य, एक जिल्हा परिषद सदस्य, दोन खासदार आहेत. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत MIM हा राष्ट्रीय पातळीवर किती जागा लढवणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts