राजकारण

राज्यमंत्री रामदास आठवले स्पष्टच बोलले ! मला शिर्डीमध्ये संधी मिळाली तर…

Ahmednagar News : जागा वाटपावरुन जास्त ओढतान करून चालणार नाही. बीजेपी कोणाचा पक्ष संपवायला चाललाय, असे अजिबात नाही. संपवण्याचा प्रयत्न केला तरी पक्ष संपत नसतो. माझ्या पक्षाचे लोकं निवडून नसले आले तरी माझा पक्ष काही संपला नाही.

मला शिर्डीमध्ये संधी मिळाली, तर या भागाचा विकास करण्यासाठी संधी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

जनतेशी संवाद साधण्यासाठी मंत्री आठवले काल मंगळवारी (दि.५) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी शिर्डीतील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी रिपाइंचे जिल्हयाचे नेते बाळासाहेब गायकवाड, नितीन कापसे, पप्पू बनसोडे, कैलास शेजवळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री आठवले यांनी सांगितले की, मी सुरवातीला शिर्डीतून हरलो, त्यानंतर बौद्ध समाजाला अजून संधी मिळाली नाही. या मतदारसंघात बौद्ध समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

अनुसूचित जातीत बौद्ध समजाची संख्या जास्त असल्याने उमेदवारीसंदर्भात बौद्ध बांधवांच्या अपेक्षा असतील, तर भाजपने याकडे लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा मंत्री आठवलेंनी व्यक्त केली.

वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर भाजपसोबत आले तर वेल अँड गुड, परंतु ते भाजपसोबत येणार नाही, ना ते महाविकास आघाडी सोबत राहणार. स्वतंत्र निवडणूक लढवण्याची त्यांची अनेक वर्षांची भूमिका आहे. सर्व ४८ जागा ते लढतील, अशी मला अपेक्षा आहे. महाविकास आघाडी त्यांचा अपमान करत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts