Ahmednagar News : मतदारसंघात मी केलेल्या कामाचे कोणीही उद्घाटन करत आहे, मी कधीच दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेत नाहीत. सध्या जिल्हा परिषदेत मंजूर झालेल्या प्रशासकीय मान्यता स्वतःच्या नावावर खपवल्या जात आहे.
मी जे बोलतो तेच करतो, आमदार झाल्यापासून माझ्यामध्ये काहीही फरक झालेला नाही. काही लोकांनी कोरोना काळात विमानाने रेमडीसिवर आणून धंदे केले, ते कुठे गेलेत, ते विकले असा हल्लाबोल आ. निलेश लंके यांनी खासदार सुजय विखे यांचे नाव न घेता लावला.
आमदार निलेश लंके यांच्या अभिष्टचिंतन सोहळा तसेच दीड कोटी कामाच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन अकोळनेर येथे केले होते यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषदेचे बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, पंचायत समितीच्या माजी सभापती नंदा शेंडगे, माजी सरपंच सविता मेहत्रे, भानुदास जाधव, बाळासाहेब शेळके, गंगाधर दुबे, संजय गारुडकर, बाळासाहेब भोर, नारायण राऊत,
जितेंद्र मगर, सिकंदर सबकडे, रामचंद्र जाधव, सुनील पाठक, अर्जुन सोनवणे, रावसाहेब गारुडकर, सोमनाथ गारुडकर, भगवान भोर, माणिक जाधव, काका जाधव, जयदीप कोळगे, रमेश जाधव, दिलीप भोर, जीवन गायकवाड, प्रियंका लामखडे, भास्कर भोर, गणेश साठे, जनार्दन माने, सचिन दळवी, शिवाजी होळकर उपस्थित होते.