राजकारण

आमदार रोहित पवारांची ईडीकडून १२ तास चौकशी, ‘या’ तारखेला पुन्हा बोलावले, पहा काय घडलंय

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे बारामती अॅग्रोसंबंधित प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. काल (बुधवार) तब्बल १२ तास त्यांची ईडीकडून चौकशी झाली. ईडीच्या कार्यालयातून ते रात्री १० वाजता रोहित पवार बाहेर आले. चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

‘या’ तारखला पुन्हा बोलवले

आ. पवार यांना १ तारखेला पुन्हा चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. मला कुणासमोर वाकायला आवडत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राहिला विषय सहकार्याचा तर मी अधिकाऱ्यांना सहकार्य करत होतो, व मी नेहमीच सहकार्य करतो असे ते म्हणाले.

समर्थकांकडून घोषणाबाजी

आ. रोहित पवार हे बाहेर येताच राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. एक मोठा आनंदोत्सव साजरा केला. घोषणाबाजीने परिसर दुमदुमला होता. आ. रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना म्हटले की, चौकशी दरम्यान अनेक अधिकाऱ्यांना कळत नव्हतं काय करायचं, कारण तुमचे सर्व आवाज, घोषणा त्या ठिकाणी येत असल्याचे कार्यकर्त्यांना पवार म्हणाले.

अजित पवार यांना टोला

यावेळी आ. रोहित पवार यांनी शरद पवारांचे कौतुक करत असे म्हटले की, एखादा कार्यकर्ता अडचणीत आल्यावर त्याच्यावर कुठेतरी अन्याय होतो असं ज्यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला समजलं त्यावेळी बाप माणूस म्हणून ते मागे उभे राहत असतात असे ते म्हणाले. तर अजित दादांवर बोचरी टीका करत ते म्हणाले, कार्यकर्ता लढत असताना पवार साहेब त्याच्या मागे राहतात, पण ते पळणाऱ्याच्या मागे राहत नसतात असे म्हणत त्यांनी टोला हाणला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts