मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केली आणि सरकार स्थापन केले. तत्पुर्वी शिवसेनेतील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केला. त्यावरुन शिवसेनेमध्ये मोठा वाद झाला. राज्याच्या राजकारण मोठी उलथापालथ झाली. आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना बंडखोरांना चांगलच धारेवर धरलं. त्याला संजय राऊतांनी टोला लगावला आहे.
शिवसेना पक्षाशिवाय बंडखोर आमदारांचे अस्तित्वच नाही. ते शिवसेनेत नाहीत. विधिमंडळात त्यांनी त्यांचा वेगळा गट स्थापन केला आहे. पण शिवसेनेशिवाय त्यांचे अस्तित्व नाही. ते भाजपमध्ये मनाने, तनाने विलीन झाले आहेत. धनाने तर कधीच विलीन झाले आहेत, असे म्हणत संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना टोला लगावला आहे.
ते आमचे एकेकाळचे सहकारी होते. त्यांनी असे खेळ करू नयेत. तुम्हाला शिवसेनेत राहायचे नाही हे तुम्ही स्पष्ट केले आहे. मग तुम्ही लोकांना भरकटवू नका, असा सल्ला संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना दिला आहे.
तुम्ही शिवसेना सोडली आहे. पण तांत्रिकदृष्ट्या तुम्ही तसे बोललात, तर लगेच तुमची आमदारकी रद्द होईल. न्यायालयामध्ये देखील जायची गरज नाही. किंवा त्यांनी शिवसेनेने दिलेल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग त्यांनी काहीही बोलावे, असे थेट आव्हान राऊतांनी यावेळी दिले आहे.
दरम्यान, ४० आमदारांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर त्यांनी निवडणूक लढवावी. मग आम्ही त्यांची दखल घेऊ, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.