राजकारण

Sujay Vikhe Patil : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या गावात खासदार डॉ. सुजय विखेंचा अनोखा गौरव

Sujay Vikhe Patil : गेल्या दहा वर्षांत आपला असा आगळा-वेगळा भव्य दिव्य सत्कार झाला नाही तो आता होत आहे. त्यामुळेच गणेश परिसरातील माझं लाडक गाव म्हणून एकरुखे गावाची ओळख माझ्यासाठी असल्याचे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

शिर्डी मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाना विखे पाटील परिवाराकडुन दिपावलीनिमित्त मोफत पाच किलो साखर वाटप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्यावेळी एकरुखे गावात खासदार डॉ. विखे यांच्या स्वागतासाठी वज्रेश्वरी प्रतिष्ठानकडून जरा हटके स्टाईलने स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या निमित्ताने एकरुखे गावच्या वेशीपासून विविध फुलांनी सजविलेल्या रथातून (बग्गी) खा. डॉ. विखेंची मिरवणूक काढण्यात आली होती. सोबतीला सवाद्य व तरुण मित्रमंडळ वर्ग तसेच चार ते पाच जेसीबी यंत्राच्या साह्याने फुलाचा वर्षाव करत त्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यात आले. राजेशाही थाटात झालेल्या स्वागताने खासदार डॉ. सुजय विखे पाटील अक्षरशा भारावून गेले.

या कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी आवर्जून उल्लेख केला की, गत नऊ ते दहा वर्षांत आपला असा आगळा वेगळा सत्कार गावात झाला नाही तो आज वज्रेश्वरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला गेला.

ज्या तरूणानी हा सत्कार आयोजित केला. त्यांनी माझ्यासाठी एक दिवस दिला. वर्षातील त्यांच्या राहिलेल्या ३६४ दिवसाकरीता त्यांच्यासाठी आपण दिवसरात्र असेल,

गणेश परिसरातील एकरुखे गाव कायमच माझं लाडक गाव म्हणून राहीलेल आहेत. इथ अनेक प्रकारचे लोक राहातात. ते मी काही सांगण्याची गरज वाटत नाही, असे म्हणताच उपस्थितीत हास्यकल्लोळ झाला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts