राजकारण

Nana Kate : रात्री खलबत, अखेर अजितदादांनी विषय मिटवला! पिंपरीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

Nana Kate : सध्या पुण्यात निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याठिकाणी कोणाला उमेदवारी देयची याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर आता उमेदवारी जाहीर झाली आहे.

अजित पवारांनी याबाबत सर्वांशी चर्चा केली. याबाबत कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तसेच शिवसेनेचे नेते राहूल कलाटे हे देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. यामुळे ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.

तसे झाले तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी ती मोठी अडचण होणार आहे. दरम्यान, राज्यात सध्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची चर्चा सुरू आहे. सर्व पक्ष या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. या निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या.

अनेक घडामोडीनंतर उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. तसेच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काहीजण इच्छुक आहेत. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी आवाहन केले आहे. यामध्ये त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे.

असे असताना आज चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र महाविकास आघाडीचे नेते निवडणूक लढवण्यवर ठाम आहेत. भाजप नेते सर्वांशी संपर्क करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts