Nanded : राज्यात अजून एका बड्या पक्षाने पाय रोवायला सुरुवात केली आहे. भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या आपल्या पक्षाचा देशभरात विस्तार करण्याच्या हेतूने केसीआर यांनी नांदेड मार्गे महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. यामुळे आता राज्यातील राजकारण त्यांना किती यश मिळेल हे लवकरच समजेल.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची नांदेडमध्ये सभा झाली. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यांच्या या पहिल्याच सभेत मराठवाड्यासह विदर्भातील दोन माजी आमदार बीसीआर पक्षाच्या गळाला लागले आहेत.
तसेच येणाऱ्या काळात देखील अजून काहीजण प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. गडचिरोलीचे माजी आमदार दीपक आत्राम, उदगीरचे माजी आमदार मोहन पटवारी, यवतमाळचे राजन कोडक, संभाजी ब्रिगेड किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे, ढोलीराम काळदाते यांनी पक्षप्रवेश केला.
सध्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद सुरू आहे. असे असताना केसीआर यांच्या पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात उडी घेतली आहे. यामुळे त्यांनी अचूक वेळ साधली असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, नांदेडातून त्यांनी आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा संकल्प केला होता. यामुळे त्यांनी सभा घेतली. अब की बार किसान सरकार म्हणत राज्यातील शेतकऱ्यांना साद घालत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणींवर त्यांनी भाष्य केले आहे.