राजकारण

Narendra Modi : भाजप नेत्याच्या ट्विटमुळे उडाली खळबळ, म्हणाले, २०२३ च्या मध्यातच मोदींना पंतप्रधानपद सोडावे लागेल…

Narendra Modi : 2024 मध्ये भाजपने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यासाठी आतापासूनच जोरदार तयारी सुरू आहे. असे असताना आता भाजप नेत्यानेच एक खळबळ उडवून देणारे ट्विट केले आहे. यामुळे भाजप नेत्यांची झोप उडण्याची शक्यता आहे.

भाजप नेते माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी याबाबत एक वक्तव्य केले आहे. ते त्यांच्या रोखठोक विधानांमुळे कायमच चर्चेत असतात. आता त्यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून पंढरपूर कॉरिडोरची घोषणा करण्यात आली होती. कॉरिडोरला सुब्रमण्यम स्वामी यांनी विरोध केला होता.

आता त्यांनी जर अजित डोवाल यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरुन दूर केले नाही, तर मोदींना 2023 च्या मध्यात पंतप्रधानपद सोडाव लागू शकत, असे म्हटले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत आता पक्ष काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचे पावित्र्य अबाधित राहावेअशी माझी इच्छा असल्याचंही स्वामी यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी पंढरपूर कॉरिडोरला सुब्रमण्यम स्वामी यांनी विरोध केला होता. याची देखील बरीच चर्चा झाली होती.

यावेळी त्यांनी मंदिरे ताब्यात घेण्याचा कोणताही अधिकार सरकारला नाही‌. मंदिरे चालवणे हे सरकारचे काम नाही. मंदिरेच काय इतर कोणतेही प्रार्थनास्थळ सरकारला ताब्यात घेता येत नाही, असे म्हटले होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts