Nashik : राज्यात नुकतीच पदवीधर निवडणूक झाली. यामध्ये सर्वात जास्त चर्चा ही नाशिक विभागाची झाली. याचे कारण म्हणजे याठिकाणी काँग्रेसमधून बाहेर असलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे उभा होते. सत्यजित तांबे या लढतीत विजयी झाले. त्यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील यांचा पराभव केला.
असे असताना आता त्यांची पुढची भूमिका काय असणार तसेच ते कोणत्या पक्षात जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत आज ते संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यामुळे अपक्ष निवडणूक जिंकल्यानंतर सत्यजित तांबे काय भूमिका घेणार? हे आता महत्वाचं ठरणार आहे.
आता ते पुन्हा काँग्रेसशी जुळवून घेणार की भाजपसोबत हात मिळवणी करणार? याची युवकांमध्ये चर्चा सुरू आहे. निवडणुकीच्या काळात त्यांनी आपण नंतर सगळ्या प्रशांची उत्तरे देणार असल्याचे सांगितले होते. तसेच आरोपांवर सत्यजित काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी ते म्हणाले, आमच्या परिवाराने कायम राजकारण निवडणुकीपुरत केल आहे. निवडणुकीनंतर आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचे काम केल आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षाचे लोक आम्हाला मदत करत असतात, तसेच राजकीय प्रश्नांच्या बाबतीत ४ तारखेला माझी भूमिका स्पष्ट करेन, असे सत्यजित तांबे म्हणाले होते.
दरम्यान, अजित पवार यांनी सत्यजीत तांबेंना राजकीय भवितव्य पाहण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेसशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे आता नेमकी सत्यजीत तांबे पुढे काय भूमिका घेणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.