राजकारण

अहमदनगरमध्ये पुन्हा नवीन समीकरणे? आ.संग्राम जगतापांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचाच मातब्बर नेता भाजपसोबत?

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभेचे वातावरण तापू लागले आहे तसे आता नगर शहर विधानसभेच्याही चर्चा होऊ लागल्या आहेत. सध्या अहमदनगर मध्ये नगर शहराचे आ.संग्राम जगताप हे आमदार आहेत.

ते अजित पवार गटात असून त्यांचे व अभाजप खासदार सुजय विखे यांचे सख्य सर्वश्रुत आहे. परंतु शहरातील काही भाजप मंडळी मात्र जगताप यांना विरोध करताना दिसतात. आता जेव्हा राष्ट्रवादीत दोन गट पडले तेव्हा माजी आ. दादाभाऊ कळमकर हे शरद पवार गटात गेले.

सध्या त्यांचे व आ. जगताप यांचे राजकीय युद्ध सुरु असल्याचे दिसते. आता भविष्यात शहरात भाजप ही आ. जगताप यांना शह देण्यासाठी दादाभाऊ कळमकर यांना सोबत घेणार का अशी चर्चा रंगली आहे.

दादाभाऊ कळमकर यांच्या अभीष्टचिंतनाला भाजप

माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभीष्टचिंतन केले आहे. भाजपचे माजी जिल्हध्यक्ष भानुदास बेरड, शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर,

माजी शहराध्यक्ष वसंत लोढा, सरचिटणीस सचिन पारखी आदींसह पदाधिकारी यांनी त्यांची भेट घेत अभिष्टचिंतन केले. यावेळी जे वक्तव्य कळमकर यांनी केले त्यावरून विविध तर्क वितर्क लढवले जाऊ लागेल आहे.

 काय म्हणाले कळमकर

यावेळी वसंत लोढा म्हणाले, दादा कळमकर पुलोद मधून विधानसभा लढताना सर्वांनी एकमताने त्यांना पाठींबा दिला होता व पुढे दादांनीच लता लोढा महिला नगराध्यक्षा होण्यासाठी मदत केली होती. परंतु पुढे जाऊन शहरात ज्यांचे राजकारण संपल्यात जमा होते अशांना दादांनी मदत करून आमदार केल्याने शहराचे खूप मोठे नुकसान झाले असे लोढा यांनी म्हटले.

तसेच आगामी काळात शहराच्या भवितव्यासाठी दादांनी योग्य मार्गदर्शन करावे असेही म्हटले. यावर बोलताना कळमकर म्हणाले, आपण सर्वाना बरोबर घेत सर्व पक्षांशी चांगले संबध जपत राजकारण करतना कुठेही कटुता येणार नाही याची काळजी घेत आलो आहे.

आम्ही राजकारणापेक्षा मैत्री जपली आहे परंतु काही वर्षांपूर्वी एक खूप मोठी चूक व पाप मी केले असून आपले नगर शहर बदनाम व मागे गेले. शहरात व्यापार व औद्योगिक क्षेत्र शहरात कमी होत असल्याची खंत दादाभाऊ कळमकर यांनी मांडली. तसेच ते म्हणाले की,

वसंत लोढा म्हणाले ते खरं असून आता पुन्हा ती चूक करणार नसून ही चूक सुधारण्याची संधी आलेली असल्याचे कळमकर म्हणाले. वर काहीही निर्णय होवो मात्र शहरात पक्षिय मतभेद बाजूला ठेवण्यास माझी तयारी असल्याचे सूचक वक्तव्य दादा कळमकर यांनी केले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts