राजकारण

Nilesh Lanke : निलेश लंकेंचे ठरलं? विखे पाटलांविरोधात लोकसभेला शड्डू ठोकणार

Nilesh Lanke : पुण्यात पोट निवडणूकीचा प्रचार सुरू असताना आता नगर जिल्ह्यात वातावरण तापू लागले आहे. याचे कारण म्हणजे, पक्षाचा आदेश आला तर नगरमधून खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवणार, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केले आहे.

यामुळे त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. ते म्हणाले, शेवटी पक्ष मोठा असतो. आमच्या पक्षाचे नेते शरद पवार असो, आमचे नेते अजितदादा असो, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असो, जर यांनी उद्या मला आदेश तर मला लढाईला पुढे याव लागेल.

तसेच पक्षांच्या नेत्यापुढे कोणी नसतं. मी आदेशाचे पालन करणारा छोटा कार्यकर्ता आहे. जर उद्या पक्षाने सांगितले तर काही गोष्टी कराव्या लागतील, असे म्हणत त्यांनी आता तयारीच केल्याचे दिसून येत आहे. सध्या राष्ट्रवादी देखील नगरमध्ये लोकसभेसाठी उमेदवाराच्या शोधात आहे. विखे पाटील हेच भाजपचे उमेदवार असतील हे जवळपास ठरलं आहे.

यामुळे या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री झालेला पाहायला मला आवडेल. यात मला आनंद आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, पुण्याच्या पोटनिवडणुकीबाबत त्यांनी दोन्ही जागेवर विजयाचा दावा केला आहे.

ते म्हणाले, कसबा आणि चिंचवड दोन्ही जागा आमच्या निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे. सध्या पुणे पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. उमेदवारांची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराचा आता काही दिवस उरले आहेत. यामध्ये अनेक बडे नेते प्रचारात उतरले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts