राजकारण

नरेंद्र मोदींनी जे अहमदनगरमध्ये येऊन सांगितलं तेच निलेश लंके करत आहेत ? हिंदू बांधवांमध्ये संतापाची लाट

नगर मध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडी सत्तेसाठी हिंदू विरोधी ताकतींना एकत्र करत असल्याचे सांगत होते. त्याची प्रचिती नगर जिल्ह्यात पहायला मिळाली. अहिल्यानगरच्या निवडणूकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके हे हिंदू द्रोहीच्या समर्थनासाठी लोळवण करत असल्याचे समोर आले आहे.

नगरमधील छत्रपती नगर परिसरात हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी शनी मंदिर आणि हमुमानाचे मंदिर पाडणारे नवनागापूरचे सरपंच आणि शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष बबन डोंगरे यांचे समर्थन लंके यांनी मिळवले असून प्रचारासाठी त्यांना घेवून फिरत आहेत. यामुळे हिंदू बांधवांमध्ये संतापाची लाट पहायला मिळत आहे.

देशात इंडी आघाडीकडून सत्ता मिळविण्यासाठी हिंदू विरोधी संघटनांची मदत घेतली जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते आणि नगरमध्ये ही घटना उघड झाली. सत्तेसाठी अजितदादा पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवार गटात आलेले महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके अशा हिंदू विरोधी वृत्तीला पाठिंबा देत त्यांचे निवडणुकीत त्यांचे समर्थन मिळवत आहेत.

नवनागापूर येथील ग्रामपंचायतचे सरपंच बबन डोंगरे यांनी लोकांची आस्था असलेले गावातील शनी आणि हनुमानाचे मंदिर गावकऱ्यांचा विरोध असतानाही जेसीबीच्या सहाय्याने उधवस्त केले होते. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही त्यांची पहिलीच वेळ नसून या अगोदर त्यांनी गावातील दत्त मंदिराचे सुद्धा नुकसान केल्याची गावकऱ्यांनी दिली.

ज्यावेळी डोंगरे यांनी मंदिर पाडण्याचा घाट घातला होता. त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांना प्रचंड विरोध केला होता. पण गावकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी ही मंदिरे पाडली होती. यावेळी सकल हिंदू संघटनांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पण स्थानिक पारनेर- नगरचे आमदार यांनी त्यांना मदत केल्याचे गावकरी सांगत आहेत.

आता लोकसभा निवडणुकीत पुन्हा निलेश लंके यांनी या डोंगरेंना आपल्या हाताशी घेतले असून त्यांच्या घरी गुप्त बैठका घेवून कट रचले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावात डोंगरे यांच्या विरोधात संतप्त वातावरण असताना लंके हिंदू विरोधी लोकांना आपल्या कळपात ठेवत असल्याने लंके यांच्या विरोधात गावात वातारण निर्माण झाले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts