Nitesh Rane : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर काल जोरदार टीका केली होती. पुण्यातील सभेत अजित पवार म्हणाले होते की, नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर दोन वेळा निवडणुकीत पडले. एकदा कोकणात तर एकदा मुंबईत.
तसेच मुंबईत तर त्यांना एका महिलेने पाडले. असे म्हणत त्यांचा चांगलाच समाचार घेतला. आता यावरून नितेश राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, गेल्या वेळी बिचारा. एका साध्या शिवसैनिकाने पाडला माझ्या मित्राला. म्हणून ते काही होत का बघा. राणे साहेब देशाचे केंद्रीय मंत्री. मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले.
आपण काय फक्त भावी मुख्यमंत्रीच्या बॅनरच्या स्पर्धेत अडकलेले दिसत आहात. तुमचा आवडता टिल्लू, असे म्हणत पार्थ पवारांचा दाखला त्यांनी दिला होता. तसेच अजित दादा मोठे नेते. पण वाचल्या शिवाय जमतच नाही बघा.
राष्ट्रवादीच्या scriptwriter मित्रांनी जरा योग्य माहिती “लिहून” दिली पाहिजे. राणे साहेबांबरोबर शिवसेनेतून आलेले सगळे आमदार परत निवडून आले. शाम सावंत सोडून. माहिती असुदे दादा. बस या वेळी माझा मित्र पार्थ ला निवडून आणा, असेही ते म्हणाले.
दरम्यान, काल अजित पवारांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली होती. पुण्यातील पोट निवडणुकीमुळे सध्या ते पुण्यात ठाण मांडून आहेत. यामुळे सध्या राजकीय आरोप सुरू आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.