राजकारण

Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले, मी खाली वाकून दोनच व्यक्तींच्या पाया पडलो, ती नाव म्हणजे…

Nitin Gadkari : नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. नितीन गडकरी हे स्पष्ठवक्ते म्हणून ओळखले जातात.

नितीन गडकरी म्हणाले, आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला गोपीनाथ मुंडे यांचे चांगले सहकार्य लाभले. गोपीनाथ मुंडे हे आपले नेते होते. आपण भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर इंदूरमध्ये मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी आपण अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दोनच व्यक्तींना वाकून नमस्कार केलेला. त्यातले एक लालकृष्ण आडवाणी होते आणि दुसरे गोपीनाथ मुंडे होते, असेही नितीन गडकरी म्हणाले. यावेळी गडकरी यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री भारती पवार, पंकजा मुंडे, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, दादा भुसे यांच्यासह राज्यातील विविध नेते यावेळी उपस्थित आहे.

गडकरी म्हणाले, गोपीनाथ मुंडे आणि माझा अतिशय जवळचा संबंध होता. जेव्हा गोपीनाथ मुंडे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झाले त्यावेळी मी नागपूर युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो. माझे नेते आणि मार्गदर्शक म्हणून कुणी होतं तर गोपीनाथ मुंडे होते, याचा मला अभिमान आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts