मुंबई : राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला आहे. उद्धव ठाकरेंनी नुकत्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिंदे सरकार, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण या आणि अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
माणसाची चिन्हंही लोक बघतात, लोक विचार करुन मतदान करतात. मागच्या काळात काय झालंय हे सांगितलं. याचा अर्थ चिन्ह सोडायचं असं नाही, मी कायदेतज्ज्ञांशी बोलून तुम्हाला सांगतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’वर बंडखोर गटाकडून दावा करण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेकडून निवडणूक चिन्ह कायम ठेवण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक चिन्हाबाबत स्पष्टपणे भाष्य केले आहे.
‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह शिवसेनेकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. नविन चिन्हाचा विचार करण्यचा गरज नाही. शिवसेना विधीमंडळ पक्ष हा वेगळा असतो आणि रस्त्यावर संघर्ष करणारा पक्ष वेगळा आहे. त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.