Pankaja Munde : भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे या गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असल्याचे सांगितले जाते. अनेकदा त्यांना डावलून दुसऱ्यांना पदे देण्यात आली आहेत. त्यांनी देखील अनेकदा याबाबत खदखद बोलून दाखवली आहे. असे असताना आता देखील त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली तुमची ताई होऊ शकत नाही का? परळी मतदारसंघातील जल जीवन मिशन कामाच्या उद्घाटनावेळी बोलताना त्यांनी आपल्या मनातील खद्खद् बोलून दाखवली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.
त्यांनी थेट पंतप्रधान पदावरच भाष्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एवढं काम करुन पण तुम्ही म्हणता महिला विकास करु शकत नाही, असे म्हणता आज देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली तर तुमची लेक नाही होऊ शकत का, असा सवाल पंकजा मुंडे यांनी विचारला आहे.
त्यासाठी तुम्ही एकजुटीने साथ द्यायला पाहिजे. तुम्ही रामायण ऐकता, महाभारत ऐकता, त्यात काय सांगतात? रामाला साथ द्या म्हटलं जातं का? तुम्ही एकजुटीने साथ द्या असं पंकजा मुंडे म्हणाल्या. दरम्यान, काही महिन्यांपासून पंकजा मुंडेची नाराजी उघड आहे.
तसेच जलजीवन मिशन योजनेच्या भूमीपूजनावरुन गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आतापासून आगामी निवडणुकांची तयारी सुरु केली आहे.