Parner Nivadnuk : पारनेर विधानसभा मतदार संघ हा महाराष्ट्रातील एक चर्चेतला मतदारसंघ. याचे कारण असे की हा मतदारसंघ खा. निलेश लंके यांचा आहे. लोकसभा निवडणुकीसाठी लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत लंके विजयी झालेत म्हणून पारनेरच्या जागेवर, कसं निलेश लंके म्हणतील तसं? अशीच परिस्थिती राहणार होती. झालं देखील तसंच महाविकास आघाडीमधील शरद पवार गटाने निलेश लंके यांच्या धर्म पत्नी राणी लंके यांना उमेदवारी बहाल केली आहे.
दुसरीकडे महायुतीकडून या जागेवर अजित पवारांचा भिडू मैदानात उतरवला आहे. अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे दोन्ही गट या ठिकाणी आमने-सामने आहेत. त्यामुळे आधीच निवडणूक काटेदार होणार असे वाटतं होते.
दरम्यान, या जागेसाठी अनेक अपक्ष उमेदवारांनी देखील अर्ज सादर केला आहे. या मतदारसंघात बंडखोरीचे प्रमाण अधिक पाहायला मिळाले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती मधील बंडखोरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत दोन्ही गटांच्या उमेदवारांची धडधड वाढवली आहे.
तथापि अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन पक्षातच खरी लढत होणार आहे. पण या पक्षाच्या दोन नेत्यांसहित इतर १० उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. अर्थातच या ठिकाणी एक डझन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
म्हणून यंदाची पारनेर ची निवडणूक ही पंचरंगी होण्याची शक्यता आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार राणी लंके व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार काशिनाथ दाते यांच्यात खरी लढत होणार आहे.
मात्र, आता अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे माजी आमदार विजय भास्कर औटी, माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, संदेश कार्ले, मनसेचे अविनाश पवार, अपक्ष भाऊसाहेब खेडेकर हे निवडणुकीत मोठी रंगत आणणार आहेत.