Numerology:- अंकशास्त्रामध्ये कोणत्याही व्यक्तीचा जन्म हा ज्या तारखेला झालेला असतो त्या तारखेवरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व किंवा त्याचा स्वभाव कशा पद्धतीचा आहे? तसेच त्याचे भविष्यकालीन जीवन कसे राहील? त्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती दिलेले असते.
अंकशास्त्रामध्ये जी काही व्यक्तीची जन्मतारीख असते त्या जन्मतारखेवरून मुलांक काढला जातो व या मुलांकाच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल माहिती दिलेली असते किंवा माहिती आपल्याला अंकशास्त्रामध्ये मिळू शकते. जन्मतारखे मधील दोन अंकांची बेरीज करून आपल्याला मूलांक काढता येतो व त्यावरून आपल्याला एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ओळखता येते.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण अंकशास्त्रानुसार बघितले तर एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 11,2,20 आणि 29 तारखेला झालेला असेल तर अशा लोकांचा मुलांक हा दोन असतो. त्यामुळे या तारखांना जन्म झालेल्या लोकांचा स्वभाव किंवा त्यांचे व्यक्तिमत्व कसे असते?
याची माहिती आपण अंकशास्त्राच्या आधारे घेऊ शकतो.अंकशास्त्रानुसार बघितले तर मुलांक दोनचा शासक ग्रह चंद्र असल्यामुळे ते स्वभावाने खूप कोमल आणि भावनाप्रधान,हळवे असतात.
दोन मुलांक असलेली व्यक्ती स्वभावाने कसे असतात?
1- कुठल्याही गोष्टीवर पटकन रडू कोसळते- कोणत्याही महिन्याच्या दोन, 11 तसेच 20 किंवा 29 तारखेला ज्या लोकांचा जन्म झालेला असतो ते बऱ्याच प्रमाणात रडक्या स्वभावाचे असतात.
थोडीशी जरी गोष्ट बिनसली किंवा त्यांच्या मनासारखी झाली नाही तर त्यांना पटकन रडू कोसळते. तसेच या लोकांना एकट्यात रडत बसण्याची नको ती सवय असते व नको त्या गोष्टींचे टेन्शन देखील मोठ्या प्रमाणावर घेतात आणि स्वतःला मोठ्या प्रमाणावर त्रास करून घेतात.
2- स्वभाव असतो हट्टी- या लोकांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कुठलीही गोष्ट त्यांना त्यांच्याप्रमाणे किंवा त्यांच्या मनासारखीच व्हायला पाहिजे अशी इच्छा असते. नव्हे तो त्यांचा हट्टच असतो असे म्हटले तरी वावगे ठरू नये.
परंतु जर ती गोष्ट त्यांच्या मनासारखी झाली नाही तर ते पटकन नाराज होतात. यांचा एक चांगला गुण म्हणजे त्यांना जे मिळवायचे आहे त्याची जिद्द ते कायम ठेवतात व मोठ्या प्रमाणावर प्रयत्न देखील करतात. परंतु कधी कधी त्यांच्या प्रयत्नांना यश मात्र येत नाही.
3- लवकर होतात भावुक- या लोकांचा एक प्रमुख प्रॉब्लेम असा असतो की ते खूप हळव्या मनाचे असतात व त्यामुळे त्यांना मोठे निर्णय घेण्यामध्ये खूप मोठे अडचणी येण्याची शक्यता असते.
एखाद्या व्यक्तीला जर त्यांनी अडचणीत किंवा संकटात पाहिले तर लगेच त्यांना वाईट वाटायला लागते व लगेच भरून येते व मदतीसाठी ते पटकन पुढे सरसावतात. कोणालाही कोणत्याही प्रकारचे दुःख असेल तर त्यांना ते बघवत नाही.
4- अपयश आले तर पटकन होतात निराश- तसेच हे लोक कामामध्ये यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतात व जर अपेक्षित यश मिळाले नाही तर लगेच निराश होतात मोठ्या प्रमाणावर खचून जातात. या परिस्थितीतून उभारी घेण्यासाठी किंवा बाहेर निघण्याकरिता त्यांना खूप वेळ लागतो.
( टीप- वरील माहिती अंकशास्त्रानुसार असून ती वाचकांसाठी माहिती करिता सादर करण्यात आली आहे. या माहितीचे अहमदनगर लाईव्ह 24 कुठलाही प्रकारचे समर्थन किंवा या माहिती विषयी दावा करत नाही.)