Politics News : राजकारणी लोकांकडे महागड्या गाड्या, नोकर-चाकर, 24 तास पोलीस सुरक्षा, समाजात मान-प्रतिष्ठा असते. यामुळे अनेक तरुण राजकारणात उतरतात. राजकारणात अथक परिश्रम करतात आणि यशस्वी देखील होतात.
मात्र सर्वांच्याच बाबतीत असंच घडतं असं नाही. राजकारणापायी काही लोकांना आपलं सर्व काही गमवाव देखील लागल आहे. वाशिम येथून असच एक उदाहरण समोर आल आहे. राजकारणामुळे वाशिम येथील महादेव ताटके यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे.
आधी राजासारखे आयुष्य जगणारे महादेव ताटके जेव्हा राजकारणात इंट्री घेतात तेव्हा त्यांच्यासमवेत नको ते घडतं आणि आयुष्याची जमापुंजी त्यांच्या हातून निघून जाते. राजकारणात येण्यापूर्वी महादेव ताटके हे करोडोच्या संपत्तीचे मालक होते.
परंतु राजकारणात आल्यानंतर त्यांच्या समवेत विपरीत घडले आणि करोडोची संपत्ती तर गेलीच मात्र आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया महादेव ताटके यांच्या समवेत नेमके घडले तरी काय.
कोण आहेत महादेव ताटके ?
मंगरूळपीर येथील रहिवासी महादेव ताटके एकेकाळी धनाढ्य समजले जात असत. त्यांच्याकडे करोडो रुपयांची संपत्ती होती. मात्र सध्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर राजकारणापायी उपासमारीची वेळ आली आहे. तुम्ही राजकारणात येऊन चांगली प्रगती केली असल्याचे अनेक उदाहरणं समाजात पाहिली असतील.
मात्र महादेव ताटके याला अपवाद ठरतात. महादेव ताटके यांच्याबाबत बोलायचं झालं तर त्यांनी रोजगाराच्या शोधात राजधानी मुंबईला जवळ केले होते. वाशिम येथून त्यांनी रोजगारासाठी मुंबई गाठली होती. तेथे जाऊन त्यांच्या हाताला आणि परिश्रमाला मोठे यश मिळाले.
बांधकाम व्यवसायात त्यांनी आपला स्वतःचा ब्रँड तयार केला. या व्यवसायातून त्यांनी करोडो रुपयांची कमाई केली. विशेष म्हणजे महादेव ताटके यांनी गरिबी जवळून पाहिली होती. यामुळे समाजसेवा करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यासाठी मात्र त्यांनी राजकारणात येण्याचे ठरवले.
त्यांनी मुंबईहून गावाकडे पलायन केले. गावी आले समाजकारणाची कामे सुरू केलीत आणि मग पुढे राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. येथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यात मोठी उलथा पालथ झाली.
विधानसभा निवडणूक लढवली आणि सर्व गमावलं
2009 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना मोटरसायकली भेट दिल्यात. एक-दोन नाही तर तब्बल 75 मोटरसायकल ही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्यात. चार चाकी वाहने देखील कार्यकर्त्यांना दिलीत.
अन्नधान्य, खते, बी बियाणे यांचे वाटप केले. दीड लाख वाटर बॅगचे वाटप केले, साड्या चोळ्या दिल्यात. यामुळे त्यांच्या पानभर जाहिराती येऊ लागल्यात. मंत्री, राजकारण, समाजकारण इत्यादी क्षेत्रातील लोकांसमवेत त्यांचे उठणे-बसणे कॉमन झाले.
यामुळे मंगरूळपीर नगरपालिका, पंचायत समितीमध्ये आपली माणसे निवडणुकीत उभी करून निवडून आणण्यात त्यांना यश मिळाले. यामुळे गदगद झालेले ताटके यांनी 2009 मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र अपक्ष म्हणून 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत उभे राहिलेले ताटके यांना पराभव स्वीकारावा लागला.
यामुळे राजकारणात तर त्यांचे नुकसान झालेच मात्र त्यांचे मोठे आर्थिक नुकसान देखील झाले. राजकारणासाठी त्यांनी पाण्यासारखा पैसा वाहिला. मात्र त्यांना यश मिळाले नाही. सध्या त्यांना 50-100 रुपयांसाठी देखील दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे.
ते सांगतात की, त्यांच्याकडे दहा कोटी रुपयांपर्यंतचा पैसा होता. मात्र आता त्यांच्याकडे एक रुपया देखील राहिलेला नाही. कष्टाने कमावलेला सारा पैसा राजकारणामुळे वाया गेला आहे. त्यांनी ज्या लोकांना मदत केली आता तेच लोक त्यांच्याकडे पाठ फिरवत आहेत.