Pune : सध्या पुण्यात पोट निवडणूकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर येणार आहेत. अमित शाह 18 आणि 19 तारखेला पुणे दौऱ्यावर येत आहेत. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाजपने या दौऱ्याची जोरदार तयारी केली आहे.
यामुळे महाविकास आघाडी सतर्क झाली आहे. अमित शहांच्या दौऱ्यानंतर महाविकास आघाडी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. यासाठी अजित पवार मैदानात उतरले आहेत. अजित पवारांनी सर्व यंत्रणा उभी केली असून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.
कसबा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. 20 तारखेला पुन्हा कसब्यात अजित पवार जाहीर सभा घेणार आहेत. या सभेला काँग्रेसचे मोठे नेतेही उपस्थित राहणार आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्यकर्ता मेळाव्यानंतर आता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीची सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे आता प्रचार शिगेला पोहोचला आहे.
अजित पवारांनी चिंचवडनंतर आता कसब्यात लक्ष केंद्रीत केले आहे. 20 तारखेला महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे बडे नेते तसेच काँग्रेसचे केंद्रीय पातळीवरचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत.
यामुळे आता महाविकास आघाडीने मोठ्या ताकदीने निवडणूक लढवण्याची तयारी केल्याचे दिसून येते. या पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यामुळे याचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.