Pune by-election : नुकतेच भाजप नेते खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. यामुळे आता रिक्त जागी पोट निवडणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे पोटनिवडणुकीच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. असे असताना आता माजी मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठ वक्तव्य केले आहे. यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता देखील कमी झाली आहे.
याबाबत वडेट्टीवार म्हणाले, आम्ही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहोत. पुण्यात बिनविरोध निवडणूक होणार नाही. पोटनिवडणुकांवेळी भाजपने कुठे आम्हाला बिनविरोध निवडून येऊ दिले? असेही त्यांनी सांगितले आहे. यामुळे आता पुण्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
तसेच आता ज्या ज्या निवडणुका येतील, त्या त्या महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. यामुळे आता निवडणूक आयोगाने निर्णय घेतल्यानंतर काय होणार हे लवकरच समजेल.
याबाबत अजून उमेदवारांची चर्चा झाली नसली तरी भाजपकडून कोणता उमेदवार दिला जाणार याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपने कसबा पोटनिवडणूकीत मोठा ताकद लावून देखील त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यामुळे आता या निवडणुकीत भाजप सावध भूमिका घेणार आहे.
दरम्यान, निवडणूक लागलीच तर बापट यांच्या कुटूंबात उमेदवारी दिली जाण्याची देखील शक्यता आहे. जर तसे झाले नाही, तर इतर देखील अनेकजनांची नावे चर्चेत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.