Rahul Gandhi : काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यामुळे मोठा गोंधळ बघायला मिळाला. काँग्रेस आता यामुळे आक्रमक झाली आहे. मोदी या आडनावार केलेल्या वक्तव्यामुळे यांच्याबाबत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे आता वाद निर्माण झाला आहे.
असे असताना आता अमेरिका, जर्मनी हे देश या निकालावर लक्ष ठेवून आहेत. आता राहुल गांधी यांच्याबाबत मूलभूत लोकशाही तत्त्वे लागू करावीत. आम्ही भारतातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधातील निर्णयाची तसेच त्यांच्या संसदीय आदेशाच्या निलंबनाची दखल घेतली आहे.
राहुल गांधी या निर्णयाविरुद्ध अपील करण्याच्या स्थितीत आहोत. हा निर्णय टिकेल की नाही आणि त्याला दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्याचे काही कारण आहे की नाही हे त्यानंतर स्पष्ट होईल. जर्मनीला आशा आहे की या प्रकरणात न्यायिक स्वातंत्र्याचे मानके आणि मूलभूत लोकशाही तत्त्वे लागू होतील, असे जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
तसेच अमेरिका भारत सरकारसोबत अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह लोकशाही मूल्यांच्या सामायिक बांधिलकीवर गुंतलेली आहे. नियम कायद्याचे आणि न्यायिक स्वातंत्र्याचा आदर हे कोणत्याही लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत, असेही अमेरिकेने म्हटले आहे.
यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बदनामीच्या खटल्यात सूरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवले. यानंतर त्यांना खासदारकी आणि दिल्लीतील घर सोडावे लागले आहे.