राजकारण

Rahul Gandhi : मोठी बातमी! भाजप आक्रमक, राहुल गांधींची खासदारकी रद्द होणार?

Rahul Gandhi : केंब्रिज विद्यापीठात केलेल्या वक्तव्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माफी न मागितल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या वक्तव्यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल गांधी यांनी माफी न मागितल्यास त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी भाजप खासदारांकडून होत आहे.

यामुळे आता राहुल गांधी यांची खासदारकीही धोक्यात आली आहे. संसद, लोकशाही आणि संस्थांचा अवमान करणाऱ्या विधानांमुळे त्यांच्याविरोधात विशेष समिती स्थापन करण्याची मागणी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केली आहे. यामुळे आता राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान, खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल यांच्या संसद, लोकशाही आणि संस्थांचा अवमान करणाऱ्या विधानांमुळे त्यांच्याविरोधात विशेष समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे राहुल यांचे लोकसभा सदस्यत्व संपवण्यासाठी विशेष समिती स्थापन करावी, अशी मागणी केली आहे.

भाजपचे अनेक नेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला करत आहेत. रोज सकाळी एक कॅबिनेट मंत्री राहुल गांधींवर हल्लाबोल करत आहेत.राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून सातत्याने होत आहे. यामुळे आता राहुल गांधी माफी मागणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राहुल गांधी यांनी युरोप-अमेरिकेत केलेल्या वक्तव्यांमधून संसद आणि देशाच्या प्रतिष्ठेला सातत्याने कलंक लावला असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे. त्यामुळेच त्यांना संसदेतून काढून टाकण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

याबाबत मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत संसद भवनात वरिष्ठ मंत्र्यांची बैठक झाली. ज्यामध्ये आगामी काळात राहुल यांच्या विरोधात हे प्रकरण पुढे नेण्यावर चर्चा झाली. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts