Rahul Gandhi : सध्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता यामध्ये कर्नाटकची विधानसभा निवडणूक होणार आहे. कर्नाटकच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून त्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे.
असे असताना कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाला मोठ्या आशा असून त्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. कर्नाटकात जर काँग्रेस पक्ष सत्तेवर आला तर बेरोजगारांना दोन वर्षे दरमहा 3000 रुपये भत्ता देणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
यामुळे याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. अशी घोषणा करणारा काँग्रेस हा पहिलाच पक्ष आहे. बेळगावमध्ये झालेल्या सभेमध्ये राहुल गांधी यांनी ही घोषणा केली आहे. ते म्हणाले, बेरोजगारी कमी करण्यासाठी केंद्र सरकार काहीही करत नाही.
त्यामुळे काँग्रेस पक्ष बेरोजगार पदवीधरांना दोन वर्षांसाठी दरमहा 3,000 रुपये आणि पदविकाधारकांना दोन वर्षांसाठी 1,500 रुपये प्रति महिना देणार आहे. यामुळे आता यावर भाजपा काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच राज्यात अडीच लाख नोकऱ्या देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. तसेच राहुल गांधींनी कर्नाटकात 200 युनिट मोफत वीज देण्याची घोषणाही केली आहे. यामुळे आता या निवडणुकीत रंगत वाढली आहे. यामध्ये कोण बाजी मारणार हे येणाऱ्या काळात समजेल.